अहिल्या नगर BJP तर्फे – शहिददिनी अमर हुतात्म्यांना मानवंदना…
अ.नगर/प्रतिनीधी नंदकुमार बगाडे पाटील:
“भारतीय जनता पार्टी” अहिल्यानगर शहरजिल्हा अनु.जा.मोर्चाच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांनी फाशी देऊन शहिद झालेले महान क्रांतीकारी शहिद भगतसिंह,सुखदेव थापर, आणि शिवराम राजगुरु यांच्या २३ मार्च शहिददीना निमीत्त अहिल्यानगर, रामवाडी येथे अभिवादन करुन मानवंदना देण्यात आली. मोर्चाच्या शहराध्यक्षा मिराताई सरोदे व शहर चिटणीस सुनिल सकट यांनी त्यांच्या पावण प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन त्रिवार विनम्र अभिवादन केले. तसेच इंग्रजांना देशाबाहेर पळवुन लावण्यासाठी व देश गुलाम गिरीतुन मुक्त व्हावा म्हणुन देशासाठी लढुन शहिद झालेल्या सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांस शहिददीना निमीत्त भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. त्यांनी दिलेल्या बलीदानामुळेच आपला भारत देश पारतंत्र्यातुन स्वतंत्र झाला. म्हणुनच आज आपण सुजलाम, सुफलाम स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरीक म्हणुन राहात आहोत हे कदापी विसरता येणार नाही. असे प्रतीपादन सुनिल सकट यांनी केले.त्या समयी व महिला भगिनी, कार्यकर्ते आदी उपस्थीत होते.????