कोतळूक येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन
भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन
आबलोली (संदेश कदम) – भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ व २८ मार्च २०२५ रोजी कोतळूक येथे भव्य तालुकास्तरीय मातीवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राजा हिंदुस्थानी कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, कोतळूक उदमेवाडी यांच्या वतीने या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून, ग्रामदेवता श्री झोलाई व श्री वाघजाई देवीच्या पालख्यांचे सहाणेवर आगमन या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन होत आहे.
स्पर्धेची वैशिष्ट्ये आणि बक्षिसे
गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ८ संघांमध्ये साखळी पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
प्रथम क्रमांक: ₹१०,०००/- रोख रक्कम व आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक: ₹५,०००/- रोख रक्कम व आकर्षक चषक
तृतीय व चतुर्थ क्रमांक: आकर्षक चषक
वैयक्तिक बक्षिसे: उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड यांसाठी विशेष गौरव
कार्यक्रमाचे वेळापत्रक..
स्पर्धेची सुरुवात: २७ मार्च, गुरुवार सायं. ६ वा.
स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण: २८ मार्च, शुक्रवार रात्री
निलेश सुर्वे यांचा वाढदिवस सोहळा: २७ मार्च, रात्री १० वा.
सर्व क्रीडाप्रेमींनी व हितचिंतकांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहून खेळाडूंचे उत्साहवर्धन करावे, असे आवाहन राजा हिंदुस्थानी कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, कोतळूक उदमेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.