विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात “रिसर्च अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट” कार्यशाळा संपन्न

नंदकुमार बगाडे पाटील यांचक्डून .
इंदापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 मार्च 2025 रोजी “रिसर्च अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते झाले. त्यांनी अकॅडमिक डेव्हलपमेंटच्या महत्त्वावर भाष्य करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेचे प्रस्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विलास बुवा यांनी केले.
प्रथम सत्रात डॉ. सुमन पांडे यांनी संशोधन व व्यावसायिक विकास याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज व संशोधनात्मक दृष्टिकोन कसा विकसित करावा, यावर भर दिला.
द्वितीय सत्रात डॉ. दादासाहेब ढेंगळे यांनी “हाऊ टू राईट आर्टिकल्स” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. संशोधन लेखन करताना घ्यावयाच्या काळजीच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजयी केसकर होते. प्रमुख उपस्थितांमध्ये उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, आय.क्यू.ए.सी समन्वयक डॉ. प्रशांत शिंदे आणि विविध विभागांचे प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विद्या गुळीग यांनी केले तर आभार उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी मानले. कार्यशाळेला इंग्रजी विभागाच्या सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले.