सीसीटीव्ही सुरक्षेसाठी न्यू इंग्लिश स्कूल जैतापूरला डिजिटल कॅमेरा प्रदान
✍️राजू सागवेकर/राजापूर
▪️ राजापूर तालुक्यातील जैतापूर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय, जैतापूर येथे कार्यकारी संचालक श्री सतिश पाटील यांनी शाळेच्या सुरक्षेसाठी आणि देखरेखीसाठी डिजिटल कॅमेरा भेट दिला.
▪️ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजश्री राजगौडा नारे यांच्याकडे हा कॅमेरा सुपूर्त करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री दिवाकर आडविरकर गुरूजी उपस्थित होते.
▪️ मुख्याध्यापिका सौ. नारे यांनी श्री. पाटील साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले व शाळेच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.