पोलीस अधिकाऱ्यास ओरडून बोलल्याने आयपीसीच्या कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकत नाही – मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पोलीस अधिकाऱ्यास ओरडून बोलल्याने आयपीसीच्या कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकत नाही – मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

अधिवक्ता नारायण रोकडे यांनी मांडली अमर शिवाजीराव चव्हाण यांची बाजू

मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले आहे की, केवळ पोलीस अधिकाऱ्यासमोर ओरडून बोलल्याने भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करता येणार नाही. हा निकाल अमर शिवाजीराव चव्हाण यांच्या विरोधात दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात आला आहे.

प्रकरणाचा तपशील:

अमर चव्हाण यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यासमोर ओरडल्यामुळे IPC च्या कलम १८६ व ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी हा एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुरगूड पोलीस ठाणे हद्दीत अर्जुननगर अर्जुनी (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे धनश्री कला, क्रिडा, सांस्कृतिक व मनोरंजन मंडळाच्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. पोलिसांना तेथे बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळवला जात असल्याची खात्री झाल्यावर कारवाई करण्यात आली.

यावेळी, सदर व्यवसायाचा मूळ मालक अमर शिवाजीराव चव्हाण यांनी पोलिसांशी वाद घातला. त्यांनी पोलीस महासंचालकांकडून परवाना घेतल्याचा दावा केला आणि पोलिसांनी प्रवेश करू नये असा न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगितले. तसेच, पोलिसांविरोधात तक्रार करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर IPC च्या कलम १८६ आणि ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयाचा निर्णय:

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सारंग व कोतवाल आणि स. म. मोडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, FIR आणि आरोपपत्रातील मजकुराचा विचार करता, केवळ ओरडल्याने IPC च्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा सिद्ध होणार नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यावरील आयपीसीच्या कलम ३५३ अंतर्गत दाखल एफआयआर बाबत खालील न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीस स्थगिती देण्यात आली आहे.

CRIMINAL WRIT PETITION NO.6114 OF 2024

या निर्णयामुळे कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेत महत्त्वाचा संदेश गेला असून, केवळ वाद किंवा ओरडण्याने IPC ३५३ अन्वये गुन्हा ठरू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री शेवाळ संवर्धन या विषयावर...
Read More
रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

पाषाणाला लाभले 'देवपण'; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः 'भक्ती' १५ वर्षांची तपश्चर्या: कोदंबी पाषाण आणि लाकडातून साकारल्या...
Read More
पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव आबलोली (संदेश कदम) सम्यक कोकण कला संस्था (रजि.)...
Read More
गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी

लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-भांबेड परिसरात दि. २७ मार्च...
Read More
लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी

राज्यावर अवकाळीचे सावट! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यावर अवकाळीचे सावट! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज; पिके...
Read More
राज्यावर अवकाळीचे सावट! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा

अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा 📌 माजी सदस्य आशा मिरगे यांचा गौप्यस्फोट; राजकीय नेते...
Read More
अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल 📌 बहादूरशेख नाका येथे तणावपूर्ण परिस्थिती; डीवायएसपी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू...
Read More
चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल