सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड

banner

 

प्रतिनिधी – विवेकानंद फंड 

पुणे-शिरूर.

 

महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या भक्तीचे श्रद्धास्थान पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी पिंपरी दुमाला गावचे सामाजिक कार्यकर्ते अभिषेक शेळके यांची निवड झाली.

सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सोमवारी झालेल्या बैठकीत या अगोदरचे अध्यक्ष सुनील अनंथा सोनवणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवरती विश्वस्त मंडळाची चर्चा झाली या विश्वस्त मंडळामध्ये सर्वानुमते अभिषेक शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली

श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळामध्ये श्री सुनील सोनवणे श्री शेखर पाटेकर श्री कैलास पिंगळे श्री अरुण कळसकर श्री कैलास बडदे श्री डॉक्टर श्रीकांत सोनवणे हे कार्यरत असून सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे मार्गे लावण्यात हे विश्वस्त मंडळ यशस्वी ठरले आहे

महाराष्ट्रातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट पिंपरी दुमाला येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा भक्तीचा महासागर विविध जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून माणुसकी समृद्ध करण्याचा सोहळा साजरा करत असते सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भक्तांना सुख सुविधा देण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम देखील सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट पंचक्रोशी मध्ये नेहमी राबवित असते सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर श्री अभिषेक शेळके यांनी माझ्या अध्यक्ष पदाच्या काळामध्ये सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट व मंदिर परिसरातील महत्त्वाचे कामे मार्गे लावणार असल्याचे सांगितले

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...