कृष्णा बावकर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा पाणेरेस संगणक भेट
राजापूर – (संदीप शेमणकर) आडिवरे परिसरातील कांगापूर वाडीचे सुपुत्र आणि आयटी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कॉम्प्युटर इंजिनिअर कृष्णा बावकर यांनी जिल्हा परिषद शाळा, पाणेरे येथे संगणक संच भेट दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार आहे.
या प्रसंगी राजवाडी ग्रामपंचायत सरपंच अजित बंडबे, मुख्याध्यापक धसाडे सर, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका विनिशा साखरकर, व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, मुंबईहून संगणक शाळेत पोहोचविण्याची व्यवस्था चंद्रकांत बावकर यांनी केली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, भविष्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण अधिक प्रभावी करण्याचा विश्वास शाळेच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.