पुणे जिल्हा परीट समाजाच्या अध्यक्षपदी विकासराव अभंग
पुणे प्रतिनिधी
राष्ट्रसंत गाडगे महाराज धर्मशाळा आळंदी येथे पुणे जिल्हा परीट समाजाची मीटिंग संपन्न झाली त्यावेळी सर्वानुमते पुणे जिल्हा अध्यक्षपदी विकास किसन अभंग यांची एकमताने निवड करण्यात आली.
ही निवड करण्यावेळी पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्याचे अध्यक्ष पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ पदाधिकारी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष निवडी बरोबर पुणे जिल्हा युवा अध्यक्षपदी भोर तालुक्याचे अक्षय कदम यांची निवड झाली पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी हवेलीच्या संगीता ताई ननावरे यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर पुणे जिल्हा लॉन्ड्री संघटनेचे अध्यक्षपदी खेड तालुक्यातील राकेश कदम यांची निवड झाली. पुणे जिल्हा तंटामुक्ती अध्यक्षपदी जुन्नर तालुक्यातील मनोज नांगरे यांची निवड करण्यात आली.
त्याप्रसंगी ज्येष्ठ नेते नाना नाशिककर संतोष भालेकर हरिभाऊ काळे शरद नाना पवार सुधीर पाटोळे संजय भागवत सुवर्णाताई सावर्डे वैशालीताई राऊत सह जुन्नरचे अध्यक्ष सुभाष दळवी, खेडचे अध्यक्ष मयूर कदम, दौंडचे अध्यक्ष शुभम गव्हाणे, इंदापूरचे अध्यक्ष घोडके, दौंड येथील पुणे जिल्हा परिट समाजाचे उपाध्यक्ष प्रशांत भाऊ पवार, आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष सुरेश गायकवाड व पुणे जिल्ह्यातील अनेक समाज बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदकुमार बगाडेपाटिल .
आहिलयानगर.प्रतिनिधी.