समाजात वाचन संस्कृती रुजली पाहिजे – डॉ. धनंजय शिंदे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समाजात वाचन संस्कृती रुजली पाहिजे – डॉ. धनंजय शिंदे

रांजणगाव गणपती येथे राज्यस्तरीय साहित्य निर्मिती गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

पुणे (प्रतिनिधी) – विवेकानंद फंड

महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणच्या वतीने रांजणगाव गणपती येथे आयोजित राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती गौरव पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य, ललित अशा विविध प्रकारात लेखन करणाऱ्या महाराष्ट्रभरातील १० साहित्यिकांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.

दिपक तांबोळी, लक्ष्मण दिवटे, दत्ता पाटील, कमलाकर राऊत, बाळकृष्ण बाचल, उत्तम सदाकाळ, गणेश भाकरे, प्रकाश बोधे, सुभा लोंढे आणि अलकनंदा घुगे या साहित्यिकांना सन्मान चिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

शिरूर तालुक्यातील संभाजी शिवले, शंकर न-हे, दत्तात्रय जगताप, दादाभाऊ गावडे व रुपाली भोरकडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. धनंजय शिंदे (कावीळ तज्ज्ञ, मांडवगण फराटा) होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. संदीप सांगळे (अध्यक्ष, मराठी अभ्यासमंडळ, पुणे विद्यापीठ) आणि ज्येष्ठ प्रबोधनकार उत्तम अण्णा भोंडवे उपस्थित होते.

डॉ. शिंदे यांनी समाजात वाचन संस्कृती रुजवणे गरजेचे असल्याचे सांगत साहित्यिकांना प्रेरणा देणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. डॉ. सांगळे यांनी साहित्यिकांचे सामाजिक परिवर्तनात महत्त्वाचे योगदान असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर परदेशी, प्रास्ताविक प्रा. कुंडलिक कदम, तर मनोगत व्यक्त करणाऱ्यांमध्ये शेखर फराटे, प्रकाश बोधे, रुपाली भोरकडे यांचा समावेश होता.

विवेकानंद फंड यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

#SahityaPuraskar2025 #MarathiLiterature #VachanSanskriti #SahityaParishad #RanjangaonEvents #MaharashtraWriters #SahityikGaurav #ShirurNews #ReadingCulture #MarathiBooks #RajyastariyaPuraskar #LiteratureAwards #DrDhananjayShinde #ProfSandeepSangle #VivekanandFund

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात