खेडमधील चोरवणे गावातील श्री रामवरदायिनी देवीची यात्रा १२ एप्रिल रोजी उत्साहात साजरी होणार
चैत्र पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक साजशृंगार, पालखी सोहळा आणि तमाशाचा कार्यक्रम
तळवली (मंगेश जाधव)
खेड तालुक्यातील चोरवणे गावातील श्री रामवरदायिनी देवीचा वार्षिक यात्रोत्सव यंदाही पारंपरिक भक्तिभावाने, चैत्र पौर्णिमा म्हणजेच शनिवार १२ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. ही देवी तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप मानली जाते आणि स्थानिकांसह परराज्यातील भाविकांचीही ती कुलदेवता आहे.
हेमाडपंती शैलीतील पाषाणी कोरीव कलाकुसर असलेले मंदिर हे देवीच्या जागृत सान्निध्याचे प्रतीक मानले जाते. या वर्षीच्या यात्रोत्सवातही भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थ आणि देवस्थान समितीने केले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे:
सायंकाळी ६ वाजता: देवीला लाट चढविण्याची विधी
रात्री ७ वाजता: श्री देवीची महाआरती
रात्री ९ वाजता: परिसरातील देव-देवतांच्या पालख्यांचे आगमन
रात्री १० वाजता: मान्यवरांचे स्वागत व मनोगत
रात्री ११ वाजता: ढोल-ताशांच्या गजरात छबिना आणि प्रदक्षिणा
रात्री १२ वाजता: पारंपरिक लोकनाट्य तमाशा
हा उत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे, तर एक सामाजिक-सांस्कृतिक मिलन सोहळा मानला जातो. यात्रेच्या निमित्ताने चोरवणे गावात एक पर्वणीच असते. भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामवरदायिनी देवस्थान कमिटी, ग्रामविकास मंडळ चोरवणे आणि मुंबई-पुणे येथील ग्रामस्थांनी केले आहे.
#श्री रामवरदायिनी यात्रा २०२५
#चोरवणे देवी यात्रा
#खेड तालुका धार्मिक कार्यक्रम
#चैत्र पौर्णिमा यात्रा
#तुळजापूर भवानी देवी
#हेमाडपंती मंदिर चोरवणे
#कोकणातील यात्रोत्सव
#रामवरदायिनी देवी मंदिर
#लोकनाट्य तमाशा कोकण
#पालखी सोहळा २०२५