प्रभू श्रीराम यांच्या मानाच्या झेंड्याचे भारतीय लहुजी सेना व शिव स्वराज्य मंचतर्फे स्वागत
नंदकुमार बगाडेपाटील प्रतिनिधि
पुणे : भारतीय लहुजी सेना व शिव स्वराज्य मंच यांच्या वतीने प्रभू श्रीराम यांच्या मानाच्या झेंड्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफ पठाण, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, संदिप शेठ शेडगे, न्यू स्वराज्य मंचचे संस्थापक अध्यक्ष सलमान पठाण, युवा नेते विशाल मोजे, रमिज पोपटिया, अब्दुल भाई शेख, राजू भाऊ कडू, गोरख कापुरे, राज शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या विशेष सोहळ्यात सहभागी झालेल्या मान्यवरांनी प्रभू श्रीराम यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात बंधुभाव आणि एकता वाढवण्याचा संदेश दिला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवरांनी संयोजकांचे अभिनंदन केले व अशा प्रकारच्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांना पाठिंबा दर्शवला.