संगमेश्वरात गटशिक्षणाधिकाऱ्यांवर पुन्हा तक्रार; महिला शिक्षिकेचा छळ, जातीवाचक भाषेचा वापर?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संगमेश्वरात गटशिक्षणाधिकाऱ्यांवर पुन्हा तक्रार; महिला शिक्षिकेचा छळ, जातीवाचक भाषेचा वापर?

शाळा तपासणीच्या नावाखाली मानसिक छळाचा आरोप; ‘भात-वरण’च्या प्रश्नावरून सुरु झालेल्या त्रासाला शिक्षिकेने सांगितले भीषण रूप

बातमी:

संगमेश्वर (प्रतिनिधी) – संगमेश्वर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांवरील तक्रारींची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. दोन दिवसांपूर्वी एका महिला शिक्षिकेने तक्रार केल्यानंतर आता आणखी एका महिला शिक्षिकेने थेट पालकमंत्री, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), आमदार आणि शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तक्रारीत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जातीवाचक भाषेचा वापर करत, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात केलेल्या चौकशीवरून शाळा तपासणीच्या नावाखाली छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

तक्रार करणाऱ्या शिक्षिकेने राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत झालेल्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात जेवणाच्या गुणवत्तेबाबत चौकशी केल्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कडवई येथील शाळेतील तपासणीवेळी तिचा हेतुपुरस्सर छळ केला, असा आरोप केला आहे. शाळा तपासणीसाठी एकूण ९ जणांचा फौजफाटा पाठवण्यात आला होता. तपासणीदरम्यान शिक्षिकेला वर्गाच्या बाहेर उभे केले गेले, रेकॉर्ड तपासणीच्या वेळी “भात कसा होता?” आणि “वरण कसं पाहिजे म्हणून ट्रेनिंगला जाता का?” अशा अवमानकारक शब्दांत प्रश्न विचारले गेले.

 

तसेच, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करतात असा शेरा देऊन शिक्षिकेची प्रतिमा मलीन केली. जेव्हा या प्रकाराबाबत विचारणा केली गेली, तेव्हा “साधीसुधी तक्रार करू नका, थेट आयुक्तांकडे जा” अशी आक्रमक भाषा वापरण्यात आली. या शाळा तपासणीदरम्यान उपस्थित ९ जणांपैकी फक्त चार जणांनी उपस्थितीची सही केल्याचा आरोपही शिक्षिकेने केला आहे, ज्यामुळे तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

या मानसिक छळामुळे नैराश्याने ग्रस्त झाल्याचे सांगत, आपण आपल्या जीवाचे काही बरे वाईट केल्यास त्यास जबाबदार गटशिक्षणाधिकारी असतील, असा गंभीर इशारा संबंधित शिक्षिकेने तक्रारीत दिला आहे. सदर तक्रार प्राथमिक शिक्षणाधिकारी, मंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे.

 

या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते, गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

हॅशटॅग्स:

#SangameshwarNews #TeacherHarassment #EducationDept #GatShikshanAdhikari #UdaySamant #ShekharNikam #KiranSamant #RatnagiriNews #MentalHarassment #ZPAction

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...


What do you like about this page?

0 / 400

05:50