क्रिप्टो करन्सीचा मोह महागात! नाशिकमध्ये ३८ गुंतवणूकदारांना ८१ लाखांचा गंडा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 क्रिप्टो करन्सीचा मोह महागात! नाशिकमध्ये ३८ गुंतवणूकदारांना ८१ लाखांचा गंडा

दरमहा पाच हजार लाभांश, सहलीचे आमिष अन् ‘ओरीस कॉईन’ योजनेचा फसवा जाळ! सात जणांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी 

‘फक्त १ लाख ४० हजार गुंतवा आणि दरमहा ५ हजार मिळवा’ या आमिषाला भुलून नाशिकमधील तब्बल ३८ गुंतवणूकदारांनी ओरीस क्रिप्टो करन्सीत ८१ लाख रुपयांची गुंतवणूक केली, मात्र काही दिवसांतच या योजनेचा फसवा चेहरा उघड झाला. दरमहा परतावा, सहलीसह इतर लाभ देण्याचे सांगून संशयितांनी पैसे उकळले. याप्रकरणी सात जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवननगर सिडको येथील श्वेता सुरते यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रसाद तडाखे, पवन उबाळे, समर्थ जगताप (रा. नाशिक), खुशाल पवार, तसेच ओरीस कॉईन क्रिप्टो करन्सीचे देशातील संचालक राहुल खुराणा, अविनाश सिंग, रहव ठाकूर या सात जणांची नावे समोर आली आहेत.

संशयितांनी ‘ओरीस कॉईन’ या क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केली. गुंतवणुकीवर दरमहा पाच हजारांचा परतावा, नवीन गुंतवणूकदार जोडल्यास दलाली, तसेच ‘कॅम्पमॅक्स’ येथे सहलीची व्यवस्था अशा अनेक गोष्टी सांगून त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. काहींना सुरुवातीला लाभांश दिला, मात्र नंतर तो बंद झाला.

श्वेता सुरते आणि त्यांचे भाऊ अजिंक्य सुरते यांनी अनुक्रमे १.४० लाख आणि १.१४ लाख, तर त्यांच्या ३६ ओळखीच्या गुंतवणूकदारांनी ७८.८८ लाख रुपये गुंतवले. सायबर पोलिसांनी या तक्रारीनंतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, फसवणूक झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी व्यक्त केली आहे.

भ्रामक योजनांचे सापळे कायम!
क्रिप्टो, शेअर मार्केट, इमू पालन, केबीसी, मैत्रेय अशा विविध नावांखाली गेल्या दशकभरात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. तरीही नवनवीन स्वरूपातील भ्रामक योजनांना लोक बळी पडत आहेत.

#CryptoFraud #NashikNews #InvestmentScam #OrysCoin #CrimeAlert #MLMFraud #सायबरफसवणूक #RatnagiriVartahar

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री शेवाळ संवर्धन या विषयावर...
Read More
रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

पाषाणाला लाभले 'देवपण'; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः 'भक्ती' १५ वर्षांची तपश्चर्या: कोदंबी पाषाण आणि लाकडातून साकारल्या...
Read More
पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव आबलोली (संदेश कदम) सम्यक कोकण कला संस्था (रजि.)...
Read More
गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव