ज्यांच्या कार्य कर्तृत्वासमोर भारत देश नव्हे, अखंड विश्व नतमस्तक होते असे महामानव पुन्हा होणे नाही – संजयराव शांताराम कदम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ज्यांच्या कार्य कर्तृत्वासमोर भारत देश नव्हे, अखंड विश्व नतमस्तक होते असे महामानव पुन्हा होणे नाही – संजयराव शांताराम कदम

आबलोली (संदेश कदम) 

विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधानाद्वारे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व बहाल केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क, कर्तव्य आणि अधिकार प्राप्त झाले असून ज्यांच्या कार्य कर्तृत्वा समोर भारत देशच नव्हे तर अखंड विश्वच नतमस्तक होते. असे युगप्रवर्तक,समाज नायक,बोधिसत्व,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा महामानव भारत देशातच काय, अवघ्या विश्वात देखील पुन्हा होणे शक्य नाही असे स्पष्ट मत मातोश्री लक्ष्मीबाई स्मृती मंच खेरशेत या कौटुंबिक सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजयराव शांताराम कदम यांनी केले

भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा चिपळूण या संघटनेच्या वतीने विश्वरत्न,विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे आयोजित तीन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला सांगता समारोह कार्यक्रम शहर शाखा अध्यक्ष महेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक आणि सामाजिक कार्यकर्ते संजयराव शांताराम कदम हे मौलिक मार्गदर्शन करीत होते.

यावेळी संजयराव शांताराम कदम यांनी कविता सादर केली ती म्हणजे

कोटी कोटी उपकार तुझे

तू आंम्हाला माणसात आणले ||

सम्यक बुध्दानंतर तूच भिमा

या वंचित, सोषितांना जाणिले ||

कुठे नेऊनी ठेवले आंम्हा, हिमालयही वाटे खुजा ||

असा होणे नाही भूवरी

तुझ्यासम कैवारी दुजा ||

हा झुके माथा तुझ्याच चरणी

अवघे विश्व सारे तू व्यापले ||

या संजयराव शांताराम कदम यांच्या कवितेने टाळ्यांचा कडकडाट झाला

यावेळी व्याख्याते म्हणून आयु. सुनील शिवगण गुरुजी तर शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते संजय शांताराम कदम प्रामुख्याने उपस्थित होते.

गेले दहा-बारा वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आयोजित करत असलेली भारतीय बौद्ध महासभा; शहर शाखा चिपळूण या संघटनेच्या वतीने यावर्षी व्याख्यानमालेत बदल करून फक्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी व्याख्याते म्हणून डि.बी.जे कॉलेजचे प्रा.के.एस .सावरे सर यांनी राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रनिर्मिती , उभारणी करिता जे योगदान दिले गेले त्याला या देशात तोड नाही. राष्ट्रनिर्मिती च्या अनुषंगाने केलेल्या कार्य कर्तृत्वाचा दाखला देत त्यांनी उपस्थितांना भारावून सोडले. त्यांच्या या मार्गदर्शन व्याख्यानमालाचे शुभेच्छुक म्हणून मुख्याध्यापिका सविता मोरे यांनी शुभेच्छा परत्वे विचार व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे गुरु या विषयावर आयु. अल्पेश सकपाळ , जिल्हा संस्कार विभाग हे व्याख्याते होते. तर शुभेच्छुक डि.बी.जे कॉलेजचे निवृत्त प्राचार्य मेजर संजय गवाळे सर यांनी या विषयावर आपले मनोगत व्यक्त करून भरभरून शुभेच्छा दिल्या. तिसऱ्या दिवसाचे विचारपुष्प गुंफताना आयु. सुनील शिवगण गुरुजी यांनी बुद्धगया व सद्य:स्थिती या विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता भाऊ कांबळे (कोषाध्यक्ष) किरण कदम (सरचिटणीस) नंदकुमार बनसोडे व अशोक नाईक (उपाध्यक्ष),

सचिव सर्वश्री प्रकाश पवार, दीपक कदम, अक्षय कांबळे, देवेंद्र आठवले, डॉ. चंदनशिवे तसेच संघटक अनिकेत कांबळे, के.डी.मोहिते आणि प्रा. सुधीर मोरे समवेत वैष्णवी कांबळे, सरिता जाधव, सुनंदा कदम, प्राची मोहिते आणि शारदा चंदनशिवे ( कोषाध्यक्ष, महिला तालुका) क्रांती कदम ( शहर शाखा महिला अध्यक्ष) दिशा कदम ( महिला शहर शाखा सरचिटणीस) आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी सहाय्यक गटविस्तार अधिकारी, बी.डी. कांबळे, स्मिता संजय गवाळे ( वंचित बहुजन पक्ष, राष्ट्रीय संघटक) आणि माजी प्राचार्य मेजर संजय गवाळे यांची विशेष उपस्थिती होती.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात