धाऊलवल्लीच्या गोखले विद्यालयास संगणक संच भेट; कृष्णा बावकर सरांचं डिजिटल शिक्षणासाठी मोलाचं योगदान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

धाऊलवल्लीच्या गोखले विद्यालयास संगणक संच भेट; कृष्णा बावकर सरांचं डिजिटल शिक्षणासाठी मोलाचं योगदान

banner

 

राजापूर तालुक्यातील आईटी क्षेत्रातील सुपुत्राने सामाजिक बांधिलकी जपत शाळेला दिली डिजिटल मदत

राजापूर, (संदीप शेमणकर) – आडीवरे परिसरातील राजवाडी येथील कांगापूरवाडीचे सुपुत्र आणि आयटी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कृष्णा बावकर सर यांनी धाऊलवल्ली येथील कै. सौ. आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालयास संगणक संच भेट देत डिजिटल शिक्षणासाठी भरीव योगदान दिलं आहे.

 

शाळा शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे जाव्यात, ग्रामीण भागातही डिजिटल साक्षरता वाढावी या हेतूने त्यांनी आतापर्यंत विविध शाळांना एकूण सात संगणक संच भेट दिले आहेत. ‘रायगड स्वाभिमान’ या मराठी दैनिकाचे पालघर जिल्हा संपादक संदीप शेमणकर सर यांच्या माध्यमातून गोखले हायस्कूलची माहिती मिळाल्यानंतर बावकर सरांनी ही मदत करण्याचा निर्णय घेतला.

 

कार्यक्रमात चेअरमन के.पी. गोखले सर व सचिव रमेश पाडेकर यांनी बावकर सरांचे आभार मानले. तसेच प्रशालेच्या बातम्या सातत्याने आणि निःस्वार्थपणे प्रसिद्ध करून सहकार्य करणाऱ्या संदीप शेमणकर सरांचेही विशेष आभार मानण्यात आले.

 

कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी – सुनील शिवगण, सुनील साखरकर, प्रकाश चव्हाण – यांनी जुन्या आठवणी जागवताना शाळेबद्दलचा ऋणभाव व्यक्त केला. माजी सरपंच अनंत शेमणकर यांनी विद्यार्थ्यांना शाळेविषयी निष्ठा राखण्याचा सल्ला दिला.

 

गावातील ज्येष्ठ नागरिक मधुकर वेलये, प्रशालेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी वर्ग यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिर्के सर यांनी केलं, तर शिक्षिका सौ. हळदणकर मॅडम यांनी आभारप्रदर्शन करत बावकर सर, शेमणकर सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

#राजापूर #गोखलेहायस्कूल #डिजिटलशाळा #कृष्णाबावकर #संगणकसंच #शैक्षणिकमदत #सामाजिकभान #आयटीउद्योग #संदीपशेमणकर #गौरवघडामोड

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...