अनाथ विद्यार्थ्यांसाठी “मायेची सावली”तर्फे शालेय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणतांबा येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन
मुंबई | संदीप शेमणकर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून आणि ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेल्या “मायेची सावली – एक हात कर्तव्याचा” या संस्थेतर्फे, पुणतांबा येथील मेथडिस्ट होमच्या अनाथ शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वॉशिंग मशीन व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती या पार्श्वभूमीवर राबवण्यात आला. या उपक्रमाचा ३५ वा टप्पा संस्थेने यशस्वीरित्या पार पाडला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, गोंडेगावचे माजी सरपंच संभाजीराजे बढे, शिवसेना नेते सुहास वहाडणे, महेश कुलकर्णी, बबलू कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. फादर जॉन प्रिंटर यांच्या उपस्थितीत मेथडिस्ट चर्च, पुणतांबा येथे हा वाटप समारंभ पार पडला.
खा. वाकचौरे यांनी उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “मायेची सावली परिवाराचे कार्य प्रेरणादायी असून अशा उपक्रमांना मी भविष्यात पूर्ण पाठिंबा देईन.”
कार्यक्रमात सहभागी मान्यवर:
सचिव संदीप चांदिवडे, संचालक दौलत बेल्हेकर, कार्यालय प्रमुख वसंत घडशी, विश्वनाथ जाधव, वैभव डोके, मेघा सावंत, निर्मला आवटे, रूपाली डोके, अपूर्वा पारकर, राजेंद्र पेडणेकर, दत्तात्रय काशीद आदींसह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि संस्थेच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा देण्यात आल्या.
#मायेचीसावली #शिवसेना #गुढीपाडवा2025 #AmbedkarJay
anti #सामाजिककार्य #अनाथमुल

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators