श्रीदेव माणेश्वर मंदिराचा वार्षिक यात्रोत्सव ३० एप्रिलला साजरा होणार!
चव्हाणवाडी, करेल व निवेली गावांचे आराध्य दैवत श्रीदेव माणेश्वर! निसर्गरम्य स्थळी पारंपरिक विधींनी सजलेला उत्सव
राजापूर (श्री मनोहर धुरी):
राजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी, करेल आणि निवेली या तीन गावांचे आराध्य दैवत असलेल्या जागृत श्रीदेव माणेश्वर मंदिराचा वार्षिक यात्रोत्सव ३० एप्रिल २०२५ रोजी पारंपरिक धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह संपन्न होणार आहे.
या दिवशी सकाळी ८ वाजता श्रींचा अभिषेक व मंत्रघोष, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, संध्याकाळी ७ वाजता महाआरती व साई म्युझिकल शो आणि रात्री ९ वाजता रंगतदार रेकोर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमांना परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रीदेव माणेश्वर मंदिर हे कोकणातील निसर्गाच्या कुशीत वसलेले अद्वितीय स्वयंभू शंकराचे स्थान आहे. विशेष म्हणजे या मंदिरात नाही नंदी, नाही कासव, नाही घंटा, असे वैशिष्ट्य असून हे कोकणातील एकमेव अशा प्रकारचे मंदिर आहे. मंदिरालगत पांडवकालीन तलाव असून त्यात बारमाही पाणी असते. या पाण्याने मनोभावे अंघोळ केल्यास त्वचारोग बरा होतो, अशी श्रद्धा आहे. वनराईच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर भक्तांसाठी नेहमीच आकर्षण ठरले आहे.
हॅशटॅग्स:
#श्रीदेवमाणेश्वर #यात्रोत्सव२०२५ #राजापूर #कोकणदर्शन #स्वयंभूमंदिर #KonkanDevsthan #माणेश्वरयात्