कर्नाळा खिंडीत भीषण अपघात: बोरिवलीहून सावंतवाडीला जाणारी बस उलटली; २ ठार, ३० पेक्षा अधिक जखमी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कर्नाळा खिंडीत भीषण अपघात: बोरिवलीहून सावंतवाडीला जाणारी बस उलटली; २ ठार, ३० पेक्षा अधिक जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी रात्रीची घटना; बस पलटी होऊन वाहतूक ठप्प, आपत्कालीन पथकांचा वेळीच हस्तक्षेप

बातमी
नवी मुंबई (मंगेश जाधव) – रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंड येथे बोरिवलीहून सावंतवाडीला जाणारी खाजगी बस (एमएच 47 वाय 7487) पलटी होऊन मोठा अपघात झाला. वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर कामोठे, पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पनवेल महापालिका, कळंबोली फायर ब्रिगेडचे बचाव पथक, अँब्युलन्स आणि क्रेन घटनास्थळी दाखल झाले.

या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाली होती. वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर अडथळा झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हॅशटॅग्स:
#कर्नाळा #बसअपघात #मुंबईगोवा #पनवेलबातमी #मृत्यू #अपघातवार्ता #MGMरुग्णालय #BreakingNews #KonkanNews

फोट

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

Leave a Comment

आणखी वाचा...