देवरुखमध्ये नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच वाटप; तक्रार आल्यास थेट पोलिस कारवाईचा इशारा – ना. उदय सामंत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

देवरुखमध्ये नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच वाटप; तक्रार आल्यास थेट पोलिस कारवाईचा इशारा – ना. उदय सामंत

सात महिन्यांत ५० हजार बांधकाम कामगारांची नोंदणी; रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला, मोफत कर्करोग प्रतिबंधक लसीकरण उपक्रम लवकरच सुरू

संगमेश्वर – तालुक्यातील देवरुख येथे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

या वाटपप्रसंगी ना. सामंत यांनी बांधकाम कामगारांसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देताना स्पष्ट सांगितले की, “साहित्य वाटपात जर कुणी गैरप्रकार करत असेल आणि तशी तक्रार प्राप्त झाली, तर चौकशी करून संबंधितांवर थेट पोलिस कारवाई केली जाईल.”

या कार्यक्रमात त्यांनी अभिमानाने नमूद केले की, “रत्नागिरी हा संपूर्ण महाराष्ट्रातला पहिला जिल्हा ठरला आहे जिथे केवळ सात महिन्यांत १० हजार नोंदणीवरून ५० हजारांहून अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.”

यावेळी ना. सामंत यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, “रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १ लाख महिला-भगिनींना कर्करोग होऊ नये म्हणून पुढील महिन्यापासून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोफत इंजेक्शन देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.”

याशिवाय, अंमली पदार्थांच्या विळख्यात नवीन पिढी अडकू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, माजी सभापती बाबू म्हाप, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, उपतालुका प्रमुख सचिन मांगले, शहरप्रमुख सनी प्रसादे, प्रसाद सावंत, कामगार उपायुक्त संदेश आयरे, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, नगरसेवक वैभव पवार, देवरुख नगरपंचायत मुख्याधिकारी श्री. विसपुते, तहसीलदार अमृता साबळे तसेच मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते.

#उदयसामंत #बांधकामकामगार #रत्नागिरी #देवरुख #साहित्यवाटप #मोफतलसिकरण #शिवसेना #रत्नागिरीघडामोडी #सुरक्षासंच #कामगारकल्याण

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा