खेडमध्ये भव्य शेतकरी मेळावा संपन्न; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते नूतन वास्तू व अवजारे विभागाचे उद्घाटन
प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान, हळदी उपसंशोधन केंद्राची घोषणा आणि काजू उत्पादकांना १० रु. अनुदानाची ग्वाही
खेड ( वार्ताहर)- शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि आधुनिक शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, खेड आणि खेड तालुका खरेदी-विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नूतन वास्तू आणि शेती अवजारे विभागाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी प्रगतशील शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि शेती उपयोगी साहित्य देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांशी संवाद साधताना मंत्री योगेश कदम यांनी शिवसेना महायुती सरकारने कृषी क्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. काजू उत्पादकांसाठी १० रुपये प्रतिकिलो वाढीव अनुदान, भाजीपाला उत्पादकांसाठी कोल्ड स्टोरेज युनिट्सची मंजुरी तसेच कोकणात लवकरच स्थापन होणाऱ्या हळदीच्या उपसंशोधन केंद्राचा उल्लेख करत, हे निर्णय स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास खेड तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष श्री. बाबाजीराव गोपाळ जाधव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँक संचालक श्री. सुरेश कांबळे, सहा. सरव्यवस्थापक श्री. सुनिल निकम, संघाचे उपाध्यक्ष श्री. अरविंद आंब्रे, संचालक श्री. दिनकर मोहिते, व्यवस्थापक श्री. सचिन कुळे, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जळगावकर, दापोली संघ अध्यक्ष श्री. सुधीरजी कालेकर यांच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी व असंख्य शेतकरी उपस्थित होते.
#हॅशटॅग्स:
#खेड #शेतकरीमेळावा #रत्नागिरीबँक #योगेशकदम #कोकणशेती #काजूअनुदान #हळदीउपसंशोधनकेंद्र #ModernFarming #ShivSenaMahayuti #KokanDevelopment
फोटो