दूध व माडी विक्रेत्यांच्या अडचणीवर आमदार किरण सामंत यांचा एक फोन कॉल वरून प्रोब्लेम सोडवला
महास्पीडने अचानक बंद केलेली एस.टी. पास सेवा पुन्हा सुरू; एक फोन कॉलने समस्येचे समाधान
रत्नागिरी जिल्ह्यातील दूध व माडी विक्रेत्यांना एप्रिल २०२५ पर्यंत एसटी महामंडळाच्या महास्पीड कंपनीमार्फत मासिक वाहतूक पासेस दिले जात होते. मात्र मे महिन्यापासून ही सेवा अचानक बंद करण्यात आली आणि यामुळे स्थानिक व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली.
ही बाब जैतापूरचे माजी सरपंच गिरीष करगुटकर यांनी आमदार किरण भैय्या सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली. तत्परतेने त्यांनी या प्रश्नात लक्ष घातले. “एक कॉल… प्रॉब्लेम सॉल्व!” अशी पुन्हा एकदा प्रचिती आली आणि आजपासून पासेस पुन्हा देणे सुरू झाले आहेत.
या वेळी व्यावसायिकांनी समाधान व्यक्त करत “अबकी बार नव्हे तर पुन्हा पुन्हा भैय्या साहेबांचेच सरकार” असे उद्गार काढले. जिल्ह्यातील समस्यांवर तात्काळ कृती करणारा नेता जिल्हावासीयांच्या मनात स्थान मिळवतो, हे यावरून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
#किरणसामंत #RatnagiriNews #STPassIssue #दूधविक्रेते #माडीव्यवसाय #राजकारण #समस्यांचेनिर्णयन #एककॉलप्रॉब्लेमसॉल्व #RatnagiriL