जैतापूरचा झुंजार आर्यन राऊत मुंबईत चमकला! राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जैतापूरचा झुंजार आर्यन राऊत मुंबईत चमकला! राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले!

 

✍️राजू सागवेकर / राजापूर 

मुंबई, दादर येथे आनंदराव अडसुळ चॅरिटेबल ट्रस्ट (रजी.) को.ऑ. बँक एम्लॉईज युनियन आणि आयडीयल स्पोर्ट्स अकॅडमी (रजी.) यांच्या संयुक्त विद्यमाने, एल.आय.सी. प्रायोजित राज्यस्तरीय सुपरलीग शालेय कॅरम स्पर्धा 1 ते 4 तारखेदरम्यान उत्साहात पार पडली.

 

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत निवडण्यात आलेल्या 36 उत्कृष्ट खेळाडूंमध्ये जैतापूरच्या आर्यन राऊतने आपल्या असामान्य खेळीने सर्वांची मने जिंकली. मुंबईसारख्या मोठ्या शहरातही त्याने आत्मविश्वासाने खेळत आपल्या गावाचा झेंडा उंचावला.

 

अंतिम सामन्यात आर्यनने कु. वेदिका पोमेंडकर हिला २५-० अशा एकतर्फी फरकाने पराभूत करत उपस्थितांची वाहवा मिळवली.परंतु इतर दोन्ही सहकारी खेळाडू पराभूत झाल्याने आर्यनला आपली चमकदार कामगिरी करून सुद्धा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

 

या यशानंतर माजी केंदीय अर्थ राज्यमंत्री सन्माननीय श्री. आनंदराव अडसुळ साहेब यांच्या हस्ते आर्यनचा ट्राॅफी,प्रमाणपत्र व स्ट्रायकर देऊन सत्कार करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल जैतापूरच्या मुख्याध्यापिका सौ. नारे मॅडम यांच्यासह संपूर्ण जैतापूर परिसरात आर्यनचे भरभरून कौतुक होत आहे.

 

जैतापूरचा हा हिरा भविष्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवरही नक्कीच चमकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...