आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने फसवणूक; पैसे मागणाऱ्या टोळीचा शोध
पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; नागरिकांना सावध राहण्याचे आमदारांचे आवाहन
नवी मुंबई (मंगेश जाधव): आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने पैसे मागून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आमदार ठाकूर यांनी स्वतः पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अज्ञात व्यक्तीने काही नागरिकांना फोन करून “मी आमदार प्रशांत ठाकूर बोलतो आहे” असे सांगत पैशांची मागणी केली. फोनवर बोलणारी व्यक्ती पंजाबी भाषेत संवाद साधत होती आणि आमदार ठाकर यांच्या नावाचा गैरवापर करत होती. काही जागरूक नागरिकांनी शंका आल्याने जाब विचारताच फोन कट करण्यात आला.
या घटनेची गंभीर दखल घेत आमदार ठाकूर यांनी त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. “सावधगिरी म्हणून ही तक्रार केली असून, माझ्या नावाने कोणालाही फोन आल्यास तत्काळ माझ्याशी किंवा पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
पोलीस या फसवणूकप्रकरणी तपास सुरू असून, कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. सायबर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद कॉलला प्रतिसाद देऊ नये, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
हॅशटॅग्स:
#PrashantThakur #FakeCallFraud #PanvelPolice #CyberCrime #NaviMumbaiNews #MLANameMisuse #PoliticalNews
फोटो