रत्नागिरी जिल्ह्यात उद्या 5 ठिकाणी मॉक ड्रिल; सायरन वाजवणार, अफवांपासून सावध!
सायंकाळी 4 वाजता रंगीत तालीम; नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांचे आवाहन
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात उद्या (८ मे) सायंकाळी ४ वाजता पाच ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत मॉक ड्रिल (रंगीत तालीम) घेण्यात येणार आहे. यावेळी सायरन वाजवले जाणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
आज या मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, सहायक उपनियंत्रक धमेंद्र जाधव, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार नागरी सज्जता वाढविण्यासाठी ही मॉक ड्रिल घेण्यात येत आहे.
ही मॉक ड्रिल पुढील ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे:
1. रत्नागिरी तहसिलदार कार्यालय
2. रत्नागिरी रेल्वे स्थानक
3. राजापूर नगरपालिका
4. दापोली
5. संगमेश्वर तालुक्यातील एक ग्रामपंचायत
या वेळी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्राथमिक उपचार व्यवस्था, तसेच आपदा मित्र आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक सज्ज राहणार आहेत. तालुकास्तरीय यंत्रणांनी आपले नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच, मत्स्यविभाग, बंदरे, मेरीटाईम बोर्ड, फिनोलेक्स, जेएसडब्ल्यू, अल्ट्राटेक यासह औद्योगिक वसाहतीतील महाविद्यालयांनी मॉक ड्रिल करून अहवाल सादर करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले.
हॅशटॅग्स:
#Ratnagiri #MockDrill #DisasterPreparedness #जिल्हाधिकारीरत्नागिरी #OperationAbhyas #EmergencyResponse #RatnagiriNews
फोटो