कोतळूक ग्रामदेवता सहाण ते खंडणवाडीकडे जाणा- या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे उदघाटन संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोतळूक ग्रामदेवता सहाण ते खंडणवाडीकडे जाणा- या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे उदघाटन संपन्न

आबलोली(संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील कोतळूक गावातील कोतळूक ग्रामदेवता सहाण ते खंडणीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे उदघाटन भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात सेवा करून निवृत्त झालेले जेष्ठ ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते गंगाराम पाष्टे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिलजी तटकरे यांच्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री,पालकमंत्री उदय सामंत यांनी जनसुविधा योजनेमधून मंजूर केलेल्या ५ लाख रूपये निधीतून हे काम पूर्ण झाले. भाजपाचे गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख, माजी आमदार डॉ. विनय नातू, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी तात्कालीन भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस कोतळूक ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांच्या मागणीवरून हे काम मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केले.

मंत्रालयात शासकीय नोकरी करताना आपल्या गावाबरोबरच ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांची कामे पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. निवडणूक झाल्यानंतर राजकीय पक्ष बाजूला ठेवून कोणत्याही राजकीय दृष्टीने काम न करता सामाजिक भावना ठेवून मिळेल त्या राजकीय पक्षाकडून काम केले तसेच काम भविष्यात आजच्या तरूण पिढीने केले तर ग्रामीण भागातील विकास अधिक गतीने व्हायला वेळ लागणार नाही असे मत गंगाराम पाष्टे यांनी व्यक्त केले.

भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे मनोगत व्यक्त करताना सामाजिक भावनेतून महायुतीचे सर्व पक्षातील कार्यकर्ते काम करत असून दिलेला शब्द पाळणे ही आमच्या पक्षाची शिकवण असून सामाजिक काम, विकास कामे ही होत राहतीलच पण गावाकडील तरूणांनी मुंबईला न जाता केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजना, बचत गटाच्या माध्यमातून छोटे व्यवसाय निर्माण करून रोजगार निर्मिती करून आपल्या गावाचा, भागाचा कायापालट करून एक आदर्श निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

या उदघाटन कार्यक्रमाला कोतळूक ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रगती मोहिते, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, सचिन भेकरे, सुनिल आगिवले, भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते सुनिल भेकरे, बुथ प्रमुख अनिल आरेकर, सिताराम गोरिवले, सोनू पाष्टे, गणपत गोरिवले, रामकृष्ण गोरिवले, वसंत गोरिवले, अनंत गोरिवले, मालोजी गोरिवले, सुनिल गोरिवले, शांताराम गोरिवले, प्रशांत पाष्टे, तुषार गोरिवले आदींसह महिला – पुरुष ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न