रत्नागिरी जिल्ह्यात 15 ते 18 मे दरम्यान यलो अलर्ट; नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्ह्यात 15 ते 18 मेदरम्यान यलो अलर्ट; नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

 

गडगडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता; विजेपासून सावधगिरी बाळगण्यास प्रशासनाचा इशारा

 

रत्नागिरी (प्रतिनिधी) –

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून 15 मे ते 18 मे 2025 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस, वीजांचा कडकडाट आणि 40 ते 50 किमी/ता. वेगाने वारे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे. हवामानाबाबत अचूक माहिती मिळवण्यासाठी भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही माहिती अधिकृत स्रोतांतूनच पडताळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

सावधगिरीसाठी प्रशासनाचे मार्गदर्शक सूचनाः

 

वीज चमकत असताना टीव्ही, संगणक, मोबाईल इ. उपकरणे बंद ठेवावीत

 

अशा वेळी मोबाईल किंवा लँडलाईनचा वापर टाळावा

 

उंच झाडांखाली किंवा विजेच्या खांबांजवळ उभे राहू नये

 

मोकळ्या जागेत असताना गुडघ्यात डोके घालून बसावे

 

‘दामिनी ॲप’ मोबाईलवर डाउनलोड करून वीज पडण्याची पूर्वसूचना मिळवा

 

अशा वेळी पक्क्या घरात आश्रय घ्यावा

 

 

आपत्कालीन परिस्थितीत खालील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा:

 

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष (रत्नागिरी): 02352-226248 / 222233

 

पोलीस नियंत्रण कक्ष: 02352-222222 | टोल फ्री: 112

 

जिल्हा रुग्णालय: 02352-222363

 

महावितरण नियंत्रण कक्ष: 7875765018

 

प्रत्येक तहसील कार्यालयांचे संपर्क क्रमांक:

 

रत्नागिरी: 02352-223127

 

लांजा: 02351-230024

 

राजापूर: 02353-222027

 

संगमेश्वर: 02354-260024

 

चिपळूण: 02355-252044 / 9673252044

 

खेड: 02356-263031

 

दापोली: 02358-282036

 

गुहागर: 02359-240237

 

मंडणगड: 02350-225236

 

 

 

हवामानाच्या इशाऱ्यांमुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे सर्व नागरिकांनी सजग राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

 

#रत्नागिरी #यलोअलर्ट #हवामानइशारा #वादळीवारे #वीजसावधगिरी #RatnagiriAlert #DaminiApp #IMDWeather #MonsoonPreparedness #EmergencyContacts

 

फोटो

 

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...