ॲड. नितीन तांबे यांना ‘मानद पीएचडी’ प्रदान!
सामाजिक कार्यातील योगदानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल; कन्याकुमारीत झालेल्या समारंभात सन्मान
बातमी….
जालगाव (दापोली) गावचे सुपुत्र आणि गेली १५ वर्षे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले ॲड. नितीन कल्पना यशवंत तांबे यांना ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी (अमेरिका) यांच्यावतीने ‘मानद पीएचडी’ पदवी प्रदान करण्यात आली. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्रात ३ मे २०२५ रोजी पार पडलेल्या विशेष समारंभात त्यांना हा बहुमान देण्यात आला.
युवक कल्याण, पंचायत राज, मानवी हक्क चळवळ, शासकीय योजनांची जनसामान्यांपर्यंत पोहोच यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांतून त्यांनी आपले कार्य सिद्ध केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वी त्यांना ‘राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार’ देखील प्राप्त झाला आहे.
या सन्मान समारंभास डॉ. पी. मनुले (संस्थापक अध्यक्ष, ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी), जस्टिस के. वेंकटेश (उपकुलगुरू), ठावथीरु स्वामी पद्मेंद्रा (अध्यक्ष, तामिळनाडू वॉलर पेरावी), श्री. एन. सेल्वराजन (प्रमुख, अणुशक्ती विभाग, कन्याकुमारी), के. संपतकुमार (IAS), ये. तरुणीला प्रसाद (जस्टिस, CBI कोर्ट), डॉ. इ. माँ. मसमथू (IPS, पोलीस महानिरीक्षक) आदी मान्यवर उपस्थित होते.
हॅशटॅग्स:
#NitinTambe #HonoraryPhD #SocialWork #GlobalHumanPeaceUniversity #JalgaonDapoli #RatnagiriNews #YouthEmpowerment #MaharashtraPride #कन्याकुमारी #मानदसन्मान
फोटो