दापोली तालुक्याला मिळणार बळीराज सेनेचा नवा तालुका अध्यक्ष

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दापोली तालुक्याला मिळणार बळीराज सेनेचा नवा तालुका अध्यक्ष

जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे जाहीर करणार लवकरच नवा तालुका अध्यक्ष

आबलोली (संदेश कदम)

दापोली तालुक्यातील बळीराज सेनेचा नूतन तालुका अध्यक्ष निवडण्या साठी दापोली तालुक्यात हालचालीना वेग आला असून बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी सुद्धा सक्षम तालुका अध्यक्ष पदा साठी चाचपणी सुरु केली असून मिळालेल्या माहिती नुसार दापोली तालुका अध्यक्ष पदासाठी इच्छुक कार्यकर्ते यांची लॉबींग सुरु झाली आहे.दापोली तालुक्यातील बळीराज सेनेचे कार्यकर्ते यांचे नव्या निवडीकडे लक्ष लागले आहे अध्यक्ष पदाचे निवडीसाठी लवकर दापोली मध्ये विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तालुका संपर्क प्रमुख मनोहर पवार यांनी दिली आहे. दापोली तालुक्यातील बळीराज सेनेचे अध्यक्ष पदासाठी नवीन दमदार चेहरा मिळणार असल्याचे सांगण्यात येते तालुक्यातील सर्व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन तालुका अध्यक्ष व कार्यकारणी निवडण्यात येईल अशी माहिती मनोहर पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...