आमदार शेखर निकम यांचा २६ मे रोजी चिपळूण दौरा
पूर, दरडग्रस्त भाग आणि पावसाळापूर्व तयारीसाठी १९ ठिकाणी अधिकाऱ्यांसह पाहणी
बातमी …
तळवली (मंगेश जाधव) –
दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थिती, दरडी कोसळण्याचे धोके आणि नाल्यांतील पाणी तुंबण्याच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आमदार शेखर निकम हे 26 मे रोजी चिपळूण शहरातील 19 ठिकाणी पाहणी दौरा करणार आहेत. या दौऱ्यात नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व एस.टी. विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
सकाळी 10.30 वाजता बहादूरशेख नाका येथून या दौऱ्याची सुरुवात होणार असून, तेथील जुन्या पुलाच्या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी घाट बांधण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर वांगडे मोहल्ल्यातील एस.टी. शेड व नाल्यांची पाहणी, कराड रोडवरील बीएसएनएल कार्यालय, परांजपे स्कीम, डी.बी.जे. महाविद्यालयाजवळील महामार्ग सेवा रस्ता, जिप्सी कॉर्नर, वडनाका, खानाका, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, विरेश्वर कॉलनी, पेठमाप नाईक पूल, खेराडे कॉम्प्लेक्स, मुरादपूर गणपती मंदिर अशा ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन ते परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
दरडग्रस्त भाग म्हणून खेंड महालक्ष्मीनगर, कांगणेवाडी दुर्गआळी, गोवळकोट या भागांमध्येही पाहणी केली जाणार आहे. पेठमाप येथे गाळ उपसणं आणि एन्रॉन पूलाची दुरुस्ती यासंदर्भातही ते तपासणी करणार आहेत.
या दौऱ्यानंतर शहरातील विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेत, संबंधित विभागांना उपाययोजनांची सूचना दिली जाणार असल्याची माहिती आमदार निकम यांनी दिली.
हॅशटॅग्स:
#शेखरनिकम #चिपळूणदौरा #पावसाळीपूर्वतयारी #पूरस्थिती #दरडग्रस्तभाग #चिपळूणविकास #RatnagiriNews #रत्नागिरीवार्ताहर
फोटो