ग्रामीण भागासाठी थेट, कमी वेळेत व खर्चिक एस.टी. सेवा आवश्यक!
चालक-वाहकांसोबत अधिकारीही लक्ष देऊन प्रवासी राजाच्या मागण्या पूर्ण करतील का?
रत्नागिरी जिल्ह्यातील एस.टी. सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्थेला अधिक सक्षम बनवण्यासाठी केवळ चालक-वाहकांचे नव्हे, तर आगार प्रमुख, वाहतूक नियंत्रक आणि परिवहन अधिकाऱ्यांचेही सक्रिय योगदान गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना थेट, कमी वेळेत आणि कमी खर्चात तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत सहज प्रवास करता यावा, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार दर महिन्याला ‘प्रवासी राजा दिन’ साजरा करून त्यांच्या मागण्यांचा अभ्यास आणि अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रवासी राजा ही केवळ संकल्पना न राहता, प्रत्यक्ष कृतीत उतरणे हाच यामागचा हेतू असायला हवा.
प्रस्तावित मार्ग:
1. राजापूर – भू – साटवली – पावस – रत्नागिरी
2. राजापूर – गावखडी – पावस – रत्नागिरी (परतीची सेवा आवश्यक)
3. राजापूर – डोंगर – जैतापूर – पावस – रत्नागिरी (परतीची सेवा आवश्यक)
4. येरडव – ओणी – शिवणे – कोंडदसूर – साठवली – सापूचे तळे – काजरघाटी – रत्नागिरी (परतीची सेवा आवश्यक)
5. संध्याकाळची मागणी:
रत्नागिरी – पावस – साटवली – कोंडदसूर – शिवणे – ओणी – अनस्कुरा मार्गे अक्कलकोट / नरसिंहवाडी
या मार्गांवर सध्या एस.टी. गाड्या कमी किंवा परतीच्या वेळा उपलब्ध नाहीत, यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ‘सुरक्षित सप्ताह’सारख्या अभियानांबरोबरच प्रत्यक्ष प्रवास सुखकर होईल याकडेही अधिकारीवर्गाने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.
—
#RatnagiriTransport #STBusDemand #GraminVahaatuk #PravasiRaja #PublicTransport #RatnagiriNews
फोटो















