???? माजी दहशतवादी नेत्यांचा घात: अदृश्य शक्तींचा धडका पाकिस्तानात सुरूच!
ये क्या हो रहा है! अदृश्य शक्तींचा कहर — जैशचा मोठा धक्का, भारतविरोधी आणखी एक शत्रू ठार
रत्नागिरी | पाकिस्तानात भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या दहशतवादी गटांवर अदृश्य शक्तींकडून चाललेला घातपात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ नेता मौलाना अब्दुल अजीज इसार याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
मौलाना इसार हे जैश संस्थापक मसूद अझहर यांचे जवळचे सहकारी मानले जात होते. त्यांच्या मृत्यूमागे नैसर्गिक कारण नसून ‘टार्गेट किलिंग’ असू शकते, असा संशय आहे. पाकिस्तान सरकारकडून किंवा जैशकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, ही मालिका पाहता काही ‘अदृश्य शक्ती’ हे टार्गेटेड ऑपरेशन करत असल्याचे संकेत मिळतात.
—
???? 2022 पासून आतापर्यंत 14 दहशतवादी नेते ठार:
वर्ष नाव संघटना / भूमिका ठिकाण
2022 झहूर मिस्त्री IC-814 अपहरण आरोपी कराची
रिपुदमन मलिक बाबर खालसा, कॅनडा कॅनडा
2023 बशीर पीर हिजबुल कमांडर रावळपिंडी
सय्यद शालोबर ISI लिंक खैबर पख्तूनख्वा
परमजीत पंजवार खालिस्तान कमांडो लाहोर
अवतार खांडा खालिस्तानी नेता युके
हरदीप निज्जर KTF प्रमुख कॅनडा
अबू कासिम डंगरी हल्ला सूत्रधार पीओके
जिया-उर-रहमान लष्कर समर्थक कराची
शाहिद लतीफ पठाणकोट मास्टरमाईंड सियालकोट
2024 अबू कताल डंगरी/रेसी हल्ले झेलम
अमीर हमजा माजी ब्रिगेडियर, ISI लिंक पाकिस्तान
2025 सैफुल्ला खालिद लष्कर कमांडर पंजाब (पाक)
मौलाना अब्दुल अजीज इसार जैश वरिष्ठ नेता अज्ञात परिस्थितीत मृत
—
???? ‘हमी है तो खत्म करेंगे!’
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही “सर्जिकल स्ट्राईक विना श्रेय” अशी एक आंतरराष्ट्रीय रणनीती असावी, अशा चर्चांना उधाण आले आहे. भारताचे अधिकृत नाव कुठेच जोडले जात नसले, तरी या मृत्यूंमागील ‘संधीसाधू तंत्र’ निश्चितच लक्ष वेधतंय.
—
????️
#TargetKilling #Jaish #PakistanTerror #अदृश्यशक्ती #ISI #MasoodAzhar #IndiaVsTerror #जैशचाअंत #अतिरेकीध्वस्त #RatnagiriVartahar
—
???? फोटो
साभार – रत्नागिरी वार्ताहर