???? जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निगुंडळ ग्रामपंचायतीत उत्साहात वृक्षलागवड
ग्रामदेवता मंदिर परिसरात सोनचाफा, बहावा, सुरंगी अशा फुलझाडांची रोपवाटिका सजली
५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निगुंडळ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामदेवता मंदिर परिसरात विविध फुलझाडांची भव्य वृक्षलागवड करण्यात आली. या उपक्रमात सोनमोहर, बहावा, सुरंगी, सोनचाफा अशा सुगंधी व शोभिवंत फुलझाडांची लागवड करून परिसरास हिरवळ प्राप्त झाली.
या प्रसंगी गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी शरद भांड, कृषी विस्तार अधिकारी कृष्णदेव कदम, माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, मनरेगा विभागाच्या पालक तांत्रिक अधिकारी नयना जाधव, ग्रामपंचायत अधिकारी सौ. साक्षी गोरे, कृषी सहाय्यक अमित शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामपंचायत सरपंच सौ. दीप्ती गिजे, उपसरपंच सुभाष गावडे, सदस्य मयुरेश भागवत, अंकुश पिलवलकर, सुवर्णा गावडे, मनीषा पवार, ग्रामदेवता मंदिराचे मानकरी अशोक भागवत काका, संतोष धामणस्कर, पोलीस पाटील प्रकाश आंबोकर, तसेच अंगणवाडी सेविका लीलावती भुवड, अपूर्वा कानेकर, मदतनीस सुवर्णा समगिसकर, काजल चाळके, आशा सेविका अमृता मुकनाक, कर्मचारी परशुराम मुकनाक, डाटा ऑपरेटर धनश्री समगिस्कर व युवा प्रशिक्षणार्थी सिद्धी चव्हाण हे देखील उपस्थित होते.
गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व विशद करत ग्रामस्थांना जागरूकतेचा संदेश दिला. माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी वृक्षलागवड व संवर्धनाविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले.
—
#जागतिकपर्यावरणदिन #निगुंडळ #ग्रामपंचायतउपक्रम #वृक्षलागवड #पर्यावरणसंवर्धन #गुहागर #रत्नागिरी
—
????️ फोटो