हिंदूस्थानची संस्कृती जगात सर्वोत्तम. बलदेव दास     

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हिंदूस्थानची संस्कृती जगात सर्वोत्तम. बलदेव दास     

निघोज. / प्रतिनिधी ( नदकुमार बागडे पाटील)

हिंदूस्थानची संस्कृती जगात सर्वोत्तम असून परदेशी लोक या संस्कृतीचे अनुकरण करण्यासाठी प्रयत्नशील असतात मात्र हिंदूस्थानमधील जनता पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करीत असून हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया फिलीपीन्स येथील बलदेव दास यांनी व्यक्त केले आहे. राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचे दर्शन त्यांनी घेतले तसेच जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड परिसराचा नैसर्गिक आविष्कार त्यांनी पाहिला यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त संतोषशेठ रसाळ यांच्या आग्रहाखातर त्यांनी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टला सदिच्छा भेट दिली. यावेळी ट्रस्टचे माजी कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त संतोषशेठ रसाळ होते. यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष व ट्रस्टचे विश्वस्त अनिल शेटे, पदाधिकारी राजूभाऊ लाळगे, जी आर एल कंट्रक्शनचे मालक गणेशशेठ लामखडे, प्रसिद्ध वास्तुविशारद वसंतराव वांढेकर, बालाजी कलरचे किसनराव कवाद, मळगंगा क्लॉथ सेंटरचे मालक

राजूशेठ कवाद, कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे, प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय लंके, पत्रकार संपतराव वैरागर, सागर ईरोळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बलदेव दास यावेळी म्हणाले गेली कित्येक वर्षांपासून मी विदेशातील अनेक देशांचा दौरा केला.ईस्कॉन माध्यमातून संस्कृती कुणाची सर्वश्रेष्ठ आहे याचा अभ्यास केला. हिंदूस्थानात आल्यानंतर

हरे राम हरे कृष्ण मंदीराच्या दर्शनासाठी सर्वाधिक वेळ दिला मात्र गेली तीस पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात मला या भारत देशाची संस्कृती सर्वाधिक आवडली असून ही संस्कृती जगात सर्वोत्तम असल्याचे माझे ठाम मत आहे. मात्र या भारत मातेची सध्याची युवा पिढी पाश्चात्य देशांच्या संस्कृतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असून ते अंत्यत चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गेली अनेक वर्षांपासून माझा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त व कांदा व्यवसायीक संतोषशेठ रसाळ,जी आर एल कंट्रक्शनचे मालक गणेशशेठ लामखडे,बालाजी कलरचे कवाद, राजूशेठ कवाद यांच्याशी स्नेहसंबंध जोडला गेला आहे. गेली कित्येक वर्षांपासून त्यांनी मला सातत्याने बोलावले आहे म्हणून मला या परिसरात येण्याची संधी मिळाली असून राज्यातील जागृत देवस्थान मळगंगा देवीच्या दर्शनाने मी पावण झालो आहे. जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड परिसर हा नैसर्गिक आविष्कार किती वेळ पाहात राहावा तरी सुद्धा डोळ्यांचे पारणे फिटेल असे वाटत नाही या भारत मातेच्या कुशीत असे असंख्य निसर्गाचा आविष्कार असलेले पर्यटन स्थळे आहेत मात्र कित्तेक देश फिरलो मात्र हा जगप्रसिद्ध रांजणखळगे हा निसर्गाचा आविष्कार काही औरच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त करीत केंद्र सरकारने यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून या परिसराच्या विकासासाठी मोठा हातभार लावल्यास जगातील पर्यटक मोठया संख्येने या ठिकाणी येतील स्थानिक लोकांना या निमित्ताने रोजगार व व्यवसायाची नवीन संधी उपलब्ध होउन या परिसरातील जनतेचा खऱ्या अर्थाने विकास होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.बलदेव दास यांना फक्त इंग्रजी तसेच थोड्या प्रमाणात हिंदी भाषा अवगत असल्याने ते इंग्रजीत काय म्हणतात याचे भाषांतर कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे, जी आर एल कंट्रक्शनचे मालक गणेशशेठ लामखडे, प्रसिद्ध वास्तुविशारद वसंतराव वांढेकर तसेच राजूशेठ कवाद यांनी केले यावेळी सुबोध महाराज यांनी उपस्थित ग्रामस्थांबरोबर हिंदू संस्कृती आणी जगातील देशांमध्ये असणारा देवधर्म यावर सविस्तर चर्चा करीत उपस्थीतांना मार्गदर्शन केले. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट संचालित मळगंगा प्रसादालयाला वाढदिवस निमित्ताने प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय रामचंद्र लंके व पत्रकार संपतराव वैरागर यांनी देणगी दिली यावेळी बलदेव दास यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुण त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त अनिल शेटे यांनी केले शेवटी प्रसिद्ध वास्तुविशारद वसंतराव वांढेकर यांनी आभार मानले.

चौकट

शहरांपेक्षा ग्रामीण भागात संस्कृती आणी माणुसकीचे दर्शन घडत असून देवधर्म आणी त्यांची सेवा करण्यासाठी ग्रामीण भागातील खेडूत नेहमीच आघाडीवर आहे. म्हणून देवाचे दर्शन माणसांत घ्यायचे झाल्यास ग्रामीण भागात राहणे गरजेचे असल्याचे मत बलदेव दास यांनी व्यक्त केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी आबलोली (संदेश कदम)  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाई...

Play sound