???? परप्रांतीय लपंट कामगाराचा संतापजनक प्रकार!
तळवलीतील महिलेला जबरदस्तीचा प्रयत्न; ग्रामस्थ संतप्त, आरोपींना चोप देण्याचा निर्धार
तळवली ( मंगेश जाधव प्रतिनिधी):
गुहागर तालुक्यातील तळवली येथे प्रसिद्ध लाकूड व्यावसायिक महादेव मोरे यांच्या परप्रांतीय कामगाराने एका महिलेशी जबरदस्ती करण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी यूपी येथील कामगार असून घटनेनंतर लगेचच त्याला मालकाने पळवून लावल्याची माहिती मिळते.
सदर महिला आपल्या पतीसह एका चाळीत राहते. याच चाळीत महादेव मोरे यांनी यूपीहून आणलेले काही कामगारही राहत होते. शेजारी राहत असल्याने त्यांच्यात ओळख झाली होती. या परिचयाचा गैरफायदा घेत एक कामगार महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला. महिलेने ही घटना पतीला सांगितल्यानंतर त्यांनी महादेव मोरे यांना कळवले. मात्र मोरे यांनी हा विषय लपवून ठेवत कामगारांना तातडीने अन्य ठिकाणी हलवले.
महादेव मोरे यांनी पीडित दांपत्याला “बदनामी होईल” असे सांगून गप्प बसवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मात्र प्रकार गावात उघड झाल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून, आता संबंधित कामगारांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
???? गावकऱ्यांचा इशारा: आरोपींना शोधून पोलिसांच्या ताब्यात देणार
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, संबंधित आरोपी यूपीला न गेता अन्यत्र लपून बसले आहेत. त्यामुळे गावकरी स्वतः पुढाकार घेऊन त्यांचा शोध घेण्यास सज्ज झाले असून, पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी ते निर्धारपूर्वक प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे कामगारांना अभय देणाऱ्या महादेव मोरे यालाही जाब विचारण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
???? स्थानिक पातळीवर संतापाचा उद्रेक; महादेव मोरेवरही कारवाईची मागणी
महादेव मोरे यांच्या कामगारांच्या वागणुकीबाबत यापूर्वीही तक्रारी होत्या. मात्र तक्रार करणाऱ्यांना मोरे धमकावत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे केवळ कामगारच नव्हे तर त्यांना संरक्षण देणाऱ्या या व्यावसायिकावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
????#Ratnagiri #Guhagar #Talvali #CrimeNews #BreakingNews #MahadevMore #UPWorkers #ParprantiyKamgar #WomenSafety #MarathiNews
???? फोटो