खेरशेतचे सुपुत्र अनिल कदम यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खेरशेतचे सुपुत्र अनिल कदम यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न

नवी मुंबई (मंगेश जाधव)

धम्मभूषण विकास संघ, खेरशेत (मुंबई)रजि. या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आयु. अनिल काशिराम कदम यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ ओमकार गृहनिर्माण सोसायटी ,जुईनगर (नवी मुंबई) येथे संघटनेचे माजी अध्यक्ष आयु. शरद शंकर कदम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ज्येष्ठ सल्लागार आयु. चंद्रमणी जानू कदम , खेरशेत ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष सुनील शंकर कदम, उपाध्यक्ष विजय शांताराम कदम, मुंबई संघटनेचे खजिनदार मिलिंद काशिराम कदम आणि मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

चिपळूण तालुक्यातील खेरशेत गावचे सुपुत्र आणि धम्मभूषण विकास संघ, खेरशेत (मुंबई)रजि. या संघटनेचे अध्यक्ष अनिल काशिराम कदम हे यु.टी.आय म्युअचल फंड, वाशी (नवी मुंबई )यु.एफ.सी. मधून प्रदीर्घ कार्यकाल सेवेतून सीनियर शिपाई पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले. अनिल काशीराम कदम हे खेळाडू वृत्तीचे असल्यामुळे त्यांना क्रिकेट, कबड्डी, जीमची आवड होती. याहीपेक्षा ते उत्तम प्रकारचे कॅरमपटू आहेत. त्यांची बेस्ट कॅरमपटू म्हणून विशेष ओळख आहे. इतकेच नव्हे तर जुईनगर बाल गोपाळ गोविंदा पथकाचे मुख्य मार्गदर्शक असून ,आजही ते या वयात तरुणांना लाजवेल असे धाडसी प्रयोग करित असतात. यापूर्वी ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जुईनगर या पक्षाचे माजी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. स्वभावाने स्पष्ट वक्तेपणा आणि कणखर बाणा वृत्तीची असल्यामुळे कोणताही निर्णय ते सक्षमपणे घेतात. आज प्रदीर्घ काळानंतर खेरशेत मुक्कामी तक्षशिला बुद्धविहार निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. घरच्या बिकट परिस्थिती वर मात करीत त्यांनी आपल्या कुटुंबाला सावरण्यात अथक परिश्रम घेतले. वस्तुतः खेरशेत गावचे आदर्श व प्रेरणास्थान असलेले बौद्धचार्य , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी अध्यक्ष के.जी.तथा काशिराम गुणाजी कदम यांच्या कडून त्यांना सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि क्रीडा आदी क्षेत्रातील वारसा त्यांना लाभला आहे. त्यांचे वडील के.जी. कदम हे पारंपारिक खेळातील उत्तम बनाटीपटू होते. अशा विविध क्षेत्रातील अनिल कदम यांची धडपड निश्चितच बौद्ध समाजाप्रमाणे संघटनेला देखील निश्चितच भूषणवह आहे. अशा या ‘ भीमयोद्धा ‘ सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रदीर्घ सेवापूर्तीच्या निमित्ताने आणि त्यांनी ग्रामीण/मुंबई संघटनांना दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल जुईनगर (नवी मुंबई) येथे धम्मभूषण विकास संघ,खेरशेत (मुंबई)रजि. या संघटनेच्या वतीने भव्य स्वरूपात सत्कार समारंभाच्या माध्यमातून त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अनुराधा अनिल कदम या उभयतांचा महावस्त्र ,पुष्प करंडक , सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विचारपीठावरील नियोजित समारंभाचे अध्यक्ष तथा श्रामणेर भन्ते शिवली(बौद्धजन पंचायत समिती, मुंबई) तसेच चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षण समिती, सावर्डे विभाग(मुंबई)चे अध्यक्ष धम्मभूषण विकास संघ,खेरशेत ( मुंबई )रजि.संघटनेचे माजी अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते आयु. शरद शंकर कदम यांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यांच्या समवेत चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, गावशाखा खेरशेत या ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष सुनील शंकर कदम, उपाध्यक्ष विजय शांताराम कदम, ज्येष्ठ सल्लागार चंद्रमणी जानू कदम, मुंबई संघटनेचे खजिनदार मिलिंद काशिराम कदम आणि मुंबई संघटनेचे माजी अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच , खेरशेत या कौटुंबिक सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम प्रमुख अतिथी, मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या भव्यदिव्य सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन मुंबई संघटनेचे युवा सरचिटणीस संज्योत सखाराम कदम यांनी केले. यावेळी मनोज कदम, नवनीत कदम , नितीन मि. कदम,नितीन ल.कदम , सुमित कदम, रुपेश कदम, संदेश कदम, सुमेध कदम, अविनाश पवार, अजय पवार, अभिजीत कदम, रोहन कदम, सिद्धार्थ कदम, सुकुमार कदम, चिरंजीव कदम, महेश जाधव, सौ. अंकिता जाधव, शैलेश जाधव, सौ. निलिमा जाधव, सुभाष सावंत ,सौ. सुहासिनी सावंत, प्रवीण मोहिते, सौ. प्रेरणा मोहिते, महेंद्र कदम , देवेंद्र कदम, संजय प्र.कदम,यांच्या या सहकार्यामुळे हा सत्कार समारंभ यशस्वी झाला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा