????️ बळीराज सेनेचा जिल्ह्यात निवडणूक लढवण्याचा निर्धार
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व तालुक्यांतून उमेदवार; नवतरुण, उच्चशिक्षित कार्यकर्त्यांना संधी – जिल्हाध्यक्ष पराग कांबळे
आबलोली (प्रतिनिधी – संदेश कदम): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये बळीराज सेना आपले उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे स्पष्ट संकेत जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी दिले आहेत. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
कांबळे म्हणाले, “बळीराज सेनेकडे सक्षम कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. मडगणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि गुहागर तालुक्यांमध्ये उमेदवार सज्ज आहेत. दक्षिण रत्नागिरीतील तालुक्यांमध्येही उमेदवार अंतिम टप्प्यात आहेत.”
ते पुढे म्हणाले, “बळीराज सेना ही सर्वसामान्य जनतेची चळवळ आहे. या निवडणुकीत नवतरुण, उच्चशिक्षित कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. कोकण दौऱ्यानंतर गावपातळीवर चाचपणी करून उमेदवार निश्चित केले जातील.”
कोकणात स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता असली, तरी बळीराज सेनेची कार्यकर्त्यांमधील ताकद आणि जनतेशी असलेला संपर्क पक्षाला यशाकडे नेईल, असा आत्मविश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.
—
???? #बळीराजसेना #रत्नागिरीराजकारण #जिल्हापरिषद2025 #पंचायतनिवडणूक #परागकांबळे #कोकणराजकारण