दि.१२ जुन रोजी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी आबलोली पंचक्रोशीतील इयत्ता १० वी, १२ वी परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि स्पर्धा परीक्षेत उज्वल संपादन केलेल्या गुणवत्ता विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा व एम. एस. सी. आय. टी.तील विद्यार्थांचा शुभेच्छा कार्यक्रम असा संयुक्त कार्यक्रम गुरुवार दिनांक १२ जुन २०२५ रोजी सकाळी
१० :०० वाजता सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे यानिमित्ताने आबलोली पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मौलिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी आबलोली पंचक्रोशीतील विद्यार्थांनी व पालकांनी या संपूर्ण कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थितीत राहून या संपूर्ण कार्यक्रमाचा मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी, संचालिका सौ. सावी साळवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे