शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : फळबाग व बांबू लागवडीसाठी १००% अनुदानाने अर्ज करा!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : फळबाग व बांबू लागवडीसाठी १००% अनुदानाने अर्ज करा!

???? मनरेगामार्फत आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, चिकू आणि बांबू लागवडीला चालना

रत्नागिरी :

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत (मनरेगा) रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, चिकू यांसारख्या फळबागांची तसेच बांबू लागवडीची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेत १०० टक्के अनुदान उपलब्ध असून इच्छुक शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील हवामान व जमीन फळबाग लागवडीस पोषक आहे. त्यामुळे शेतीतून दीर्घकालीन आणि शाश्वत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः जून-जुलै महिन्यात लागवड करणे फायदेशीर असून, याकाळात कलमांची वाढ उत्कृष्ट होते.

???? सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करा :

लागवडीसाठी आधुनिक CRA तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही कृषी विभागाने सुचवले असून मार्गदर्शनासाठी स्थानिक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा

✅ पात्रता व अर्ज प्रक्रिया :

क्षेत्रमर्यादा : ५ गुंठे ते २ हेक्टरपर्यंत

अनुदान वाटप :

प्रथम वर्ष – ५०%

द्वितीय वर्ष – ३०%

तृतीय वर्ष – २०%

जमीनधारणा : अल्पभूधारक शेतकरी (२ हेक्टरपर्यंत) पात्र

SC/ST शेतकरी : जमीनधारणेची अट नाही

जॉब कार्ड आवश्यक

???? आवश्यक कागदपत्रे :,अर्ज,सातबारा उतारा,८ अ उतारा,आधारकार्ड,बँक पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, संमतीपत्र, ग्रामसभा ठराव

???? फळपिकानुसार अनुदान रक्कम :

फळपिके लागवड अंतर अनुदान रक्कम,

आंबा 10×10 मी ₹2,05,512, आंबा 5×5 मी ₹2,65,850, काजू — ₹1,44,032, नारळ (बाणवली) — ₹1,67,866, सुपारी — ₹2,63,740,बांबू — ₹7,04,446

????️ अर्ज करण्यासाठी योग्य वेळ : जून – जुलै २०२५

 

???? अधिक माहितीसाठी :

तत्काळ आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.

 

 

 

???? #फळबागयोजना #मनरेगा #कृषीअनुदान #रत्नागिरीशेती #बांबूलागवड #फळबागलागवड #शाश्वतशेती #शेतीविकास

 

????️ फोटो

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...