💠 पालखी सोहळा २०२५ पूर्वतयारी बैठक पार पडली; अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचे निर्णय 💠
👉 वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काटेकोर उपाययोजना; ‘वारी ट्रॅकिंग’ व ‘प्रोजेक्ट वारी’ उपक्रमांची सुरुवात
पुणे, प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी येथील आषाढी पालखी सोहळा २०२५ पूर्वतयारीसंदर्भातील आढावा बैठक काल पार पडली. या बैठकीत वारकऱ्यांच्या सुविधांपासून सुरक्षेपर्यंत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीत देण्यात आलेले निर्देश खालीलप्रमाणे:
🔹 वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता: पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी आणि संपूर्ण मार्गावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना. पावसाच्या पार्श्वभूमीवर विश्रांती आणि मुक्कामाच्या ठिकाणी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश.
🔹 दिवे घाटात दक्षता: पावसामुळे दिवे घाटात अडथळा येऊ नये म्हणून उपाययोजना. घाट परिसरात पालखी पाहण्यासाठी नागरिकांना प्रतिबंध. डोंगर उतारांवरून दगड गळू नये यासाठी बॅरिकेटिंगचे आदेश.
🔹 रस्त्यांची दुरुस्ती व स्वच्छता: उंडवडी-कडेपठार, बारामती व इंदापूर-पंढरपूर पालखी मार्गांवरील खड्डे व राडारोडा दूर करून काम पूर्ण करण्यास सांगितले. पालखी गेल्यावर त्वरित मार्ग स्वच्छ करण्याचे आदेश जिल्हा परिषद व नगरपालिकांना.
🔹 महावितरण व वीजव्यवस्था: संपूर्ण मार्गावर वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणचे पथक कार्यरत ठेवावे. मुक्कामाच्या ठिकाणी जनरेटर उपलब्ध करावेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिला जाणार.
🔹 फलक व अडथळे हटवा: वादळामुळे अपघात टाळण्यासाठी अनधिकृत जाहिरात फलक तातडीने हटवावेत. अधिकृत फलकांचे ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ऑडिट’ करून घ्यावे.
🔹 आरोग्य व्यवस्था व कोविड दक्षता: ताप, खोकला, सर्दी यांसारखे लक्षण असणाऱ्या वारकऱ्यांची पूर्वतपासणी करावी. तपासणीसाठी आरोग्य पथकांजवळ औषधसाठा आणि वैद्यकीय सुविधा ठेवाव्यात.
🔹 डिजिटल उपक्रमांची सुरुवात:
- PTP Trafficop App: वाहतूक नियंत्रणासाठी पुणे पोलीस ट्रॅफिक शाखेचा उपक्रम.
- पालखी ट्रॅकिंग अॅप: रिअल टाईम ट्रॅकिंगसाठी.
- Project Wari: वारकऱ्यांची संख्या संगणकीय पद्धतीने मोजण्याची नवी प्रणाली.
या बैठकीला विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी, पुणे पोलीस, पीएमआरडीए, महावितरण, जिल्हा परिषद अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली.
#पालखी२०२५ #AjitPawar #AshadhiWari #WarkariSeva #ProjectWari #DehuAlandi #PandharpurWari #PalkhiSochna2025 #PuneNews #WarkariSafety
📸 फोटो

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.