???? ‘योजक’ समूहाची भेट घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांची कौतुकाची थाप!
कोकणच्या चविष्ट व दर्जेदार उत्पादनांची थेट पाहणी; आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज उद्योजक
???? रत्नागिरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांनी आज रत्नागिरी येथील लघुउद्योग वसाहतीतील ‘योजक फुड्स अॅण्ड बेव्हरेजेस प्रा. लि.’ या स्थानिक अन्नप्रक्रिया उद्योगास भेट दिली. यावेळी त्यांनी समूह निर्मित १६० हून अधिक चविष्ट आणि दर्जेदार खाद्य उत्पादनांची प्रत्यक्ष पाहणी केली.
‘योजक’ समूहामार्फत चिवडा, चकली, लाडू, आंबावडी, अळूवडी अशा पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थांपासून आधुनिक स्वादापर्यंत विविध उत्पादने तयार केली जात असून, नाना भिडेंची पुढची पिढी अत्यंत कुशलतेने या उद्योगाचे नेतृत्व करत असल्याचे उदय सामंत यांनी विशेषतः नमूद केले.
या भेटीत त्यांनी योजक समूहाच्या अन्नप्रक्रिया पद्धती, स्वच्छता व गुणवत्ता नियंत्रणाच्या कार्यपद्धतींची सखोल माहिती घेतली. “कोकणची उत्पादने केवळ चविष्ट नाहीत, तर आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
तसेच, MIDCच्या एअरपोर्ट परिसरात कोकणातील उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ‘योजक’ समूहाने पुढाकार घेतल्यास शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
—
???? #UdaySamant #YojakFoods #Ratnagiri #KonkanPride #LocalToGlobal #MaharashtraIndustry #UDYOGRatna #VocalForLocal #KonkanFood
—
???? फोटो