आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे “शाळा प्रवेशोत्सव” उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे “शाळा प्रवेशोत्सव” उत्साहात साजरा

नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण, पाठ्यपुस्तक आणि गणवेश वाटपाने कार्यक्रम संपन्न

गुहागर, तवसाळ | १६ जून २०२५
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ चे स्वागत करण्यासाठी “शाळा प्रवेशोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे मनोभावे स्वागत करण्यात आले.

या विशेष दिवशी अंगणवाडीतून पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना औक्षण करून शुभेच्छांसह शाळेच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात आली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके तसेच गणवेश वाटप करण्यात आला.

कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रमेश रत्न कुरटे, उपाध्यक्ष सौ. वैष्णवी दीपक निवाते, माजी सरपंच सौ. नम्रता वसंत निवाते, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

ग्रामपंचायत काताळेच्या सरपंच सौ. प्रियांका निलेश सुर्वे मॅडम यांनीही सदिच्छा भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.

या कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. अंकुर जनार्दन मोहिते सर, तसेच शिक्षक श्री. साईनाथ विजय पुंजारा सरश्री. संदीप बापू भोये सर यांनी केले.

???? फोटो

???? हॅशटॅग्स

#शाळा_प्रवेशोत्सव #तवसाळ_शाळा #गुहागर #रत्नागिरीशिक्षण #गणवेशवाटप #पुस्तकवाटप #मराठीबातमी #शैक्षणिकउत्सव

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री शेवाळ संवर्धन या विषयावर...
Read More
रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

पाषाणाला लाभले 'देवपण'; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः 'भक्ती' १५ वर्षांची तपश्चर्या: कोदंबी पाषाण आणि लाकडातून साकारल्या...
Read More
पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव आबलोली (संदेश कदम) सम्यक कोकण कला संस्था (रजि.)...
Read More
गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव