साटवली ग्रामपंचायत मध्ये विविध दाखले आणि योजनांची माहिती.
जितेंद्र चव्हाण (लांजा प्रतिनिधी)
लांजा तालुक्यातील साटवली ग्रामपंचायत येथे महाराज स्व अभियान अंतर्गत दिनांक 11 जून रोजी उत्पन्नाचे दाखले फॉर्म भरून घेण्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावातील व आजूबाजूच्या अनेक ग्रामस्थांनी उत्पन्न दाखले भरून लाभ घेतला. तसेच अन्य सरकारी योजना, सखोला योजना, ॲग्री स्टॅक, वारस तपास, जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन इत्यादी बाबत लोकांना ग्राम महसूल अधिकारी श्री. अजित पाटील यांनी गावातील वीस ते पंचवीस ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी अन्या गावातील लोक सुद्धा यावेळी उपस्थित होते.
सदर चा कार्यक्रम गावातील सामाजिक कार्यकर्ते इर्शाद बरमारे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साटवली ग्रामपंचायत येथे पार पडला.