कोकण रेल्वेकडून गणपती उत्सवासाठी विशेष गाड्या; आरक्षण २३ जूनपासून

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

🚆 चाकरमान्यांसाठी दिलासादायक!

 

कोकण रेल्वेकडून गणपती उत्सवासाठी विशेष गाड्या; आरक्षण २३ जूनपासून

रत्नागिरी | प्रतिनिधी

कोकणातील लाखो चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा लवकर येणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने २३ जूनपासून गणपती स्पेशल रेल्वे आरक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह इतर शहरांतील चाकरमानी गावी परतण्यासाठी या आरक्षणाचा मोठा लाभ होणार आहे.

गणपती उत्सव यंदा २७ ऑगस्ट २०२५ (बुधवार) रोजी साजरा होणार असून, गणपती आगमनाच्या ६० दिवस आधी म्हणजेच २३ जूनपासूनच आरक्षण सुरु करण्यात येणार आहे. मागील वर्षी हा उत्सव ७ सप्टेंबरला सुरू झाला होता, मात्र यावर्षी तो लवकर येत असल्याने कोकण रेल्वेने तयारीला सुरुवात केली आहे.

२५ व २६ ऑगस्टला होणाऱ्या प्रवासासाठी आरक्षणांना सर्वाधिक मागणी असते. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दरवर्षी मोठी असते. यासाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने २५० हून अधिक गणपती स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. यंदाही मुंबई-गोवा महामार्गाची अपूर्ण स्थिती लक्षात घेता रेल्वेचाच पर्याय चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

कोकण रेल्वेने या पार्श्वभूमीवर पावसाळी वेळापत्रकात बदल करून चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर करण्याचे नियोजन केले आहे.

 

🔖 महत्त्वाचे मुद्दे:

२३ जूनपासून गणपती स्पेशल आरक्षणास सुरुवात

२५-२६ ऑगस्टसाठी सर्वाधिक गर्दी अपेक्षित

२५० पेक्षा अधिक गणपती स्पेशल ट्रेनचा प्रस्ताव

मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण; रेल्वेचाच प्रमुख पर्याय

 

 

🏷️ #RatnagiriNews #KonkanRailway #GanpatiSpecial2025 #गणपतीआरक्षण #चाकरमानीविशेष #कोकणरेल्वे

 

📸 फोटो

 

 

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...