शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा पंढरपूर येथे स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा पंढरपूर येथे स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

आम.शेखरजी निकम आणि प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती

आबलोली (संदेश कदम) 

चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली येथील सन २००१ ते २०२४ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.

या मेळाव्यासाठी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालया मार्फत स्थापन करण्यात आलेल्या सह्याद्रि ॲग्री अल्युम्नी असोसिएशन च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ातील माजी विद्यार्थ्यांना संघटीत करणे,आजी व माजी विद्यार्थ्यांसोबत ऋणानुबंध कायम ठेवणे व विविध समाज उपयोगी उपक्रम राबवणे हा प्रमुख उद्देश ठेवुन पंढरपुर मध्ये प्रथमच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यासाठी पंढरपूर व नजीकच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.आम.शेखरजी निकम यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत विविध आठवणींना उजाळा दिला.महाविद्यालयाच्या स्थापनेपासुन आजतागायत झालेल्या शैक्षणिक प्रवासाचा त्यांनी आढावा घेतला.विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती व्यवसाय करावा, एआय तंत्रज्ञान व इतर संबंधित बाबींचा वापर करुन शेती पुरक व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप द्यावे असे प्रतिपादन केले.प्राचार्य डाॅ.सुनितकुमार पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित केले.सुमारे २५ वर्षाच्या कार्यकाळात हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार होता आले तसेच त्यांच्या सुख दुखात सहभागी होता आले व त्यांचे उज्ज्वल यश ही बघता आले ही भाग्याची गोष्ट आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार आम. शेखरजी निकम व डाॅ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते करण्यात आले.या सोहळ्यात सहभागी झालेले विद्यार्थी महाविद्यालयातील आठवणींनी भारावून गेले.पंढरपूर तथा विठुरायाच्या पावन नगरीत हा स्नेहमेळावा अगदी पालखीच्या पूर्वार्धात होण्याचा योगायोग नक्कीच पावित्र्यपूर्णता दर्शवत आहे.कोणताच आणि कुठलाच संबंध नसताना महाविद्यालयाच्या माध्यमातून आपणा सर्वांना आयुष्यभरासाठी एकत्रित बांधणारा धागा आदरणीय शेखर सर आणि ज्यांनी हा धागा हृदयापासून जपला व वेळोवेळी अधिक घट्ट केला असे आपले प्राचार्य आदरणीय पाटील सर यांच्याबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांनी ऋण व्यक्त केले व महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे मार्गदर्शनानुसार डाॅ.हरिश्चंद्र भागडे,प्रा.प्रसाद साळुंके, श्री.विपुल घाग,प्रा.प्रणय ढेरे व प्रा.रविंद्र सरगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा