सिंधुदुर्ग -(मालवण)- छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ता.२८ रोजी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता.यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि त्याच वेळी स्थळा ची पाहणी साठी आलेले खासदार नारायण राणे, माजी खा. निलेश राणे यांचे यांचे समर्थक राजकोट किल्ला येथे आमनसामने आल्याने एकमेकांना भिडले.ठाकरे शिवसेना आणि भाजप च्या गटातील या राड्यात दगडफेकीचे व धक्काबुक्की चे प्रकार घडले.दोन्ही गटांनी एकमेकांना विरोधात घोषणा बाजी ही केली, त्यामुळे संपूर्ण तालुक्यात तणाव निर्माण झाला होता अखेर पोलिसांनी दोन्ही गटा चे समर्थकांना तेथून पांगवण्यात यश आले,
