🔷 रवींद्र चव्हाण नवे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष – कोकण च्या सुपुत्रा चा सन्मान
मुंबई | १ जुलै २०२५
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, ही नियुक्ती पक्ष संघटनेतील मोठा निर्णय मानला जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता चव्हाण हे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे चार वेळा आमदार असून, त्यांनी महापालिका राजकारणापासून ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास केला आहे. केंद्रीय पर्यवेक्षक किरेन रिजिजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास :
- भाजप युवा मोर्चातून राजकीय कारकीर्दीची सुरुवात
- २००५ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक
- सलग चार वेळा डोंबिवली मतदारसंघातून आमदार
- अन्न-नागरिक पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, बंदर आणि आयटी विभागांचे मंत्री
- सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांचे पालकमंत्री
राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेता, पक्ष संघटनेला गती देण्यासाठी ही निवड निर्णायक ठरेल. शिवाय, मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व, संघप्रेमी पार्श्वभूमी आणि पक्षाशी असलेली निष्ठा यामुळेच चव्हाण यांची निवड झाली असावी, असे मत व्यक्त केले जात आहे.
⭕ रत्नागिरी वार्ताहर तर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ⭕
#RavindraChavan | #BJPMaharashtra | #RavindraChavanBJP | #MaharashtraPolitics | #DevendraFadnavis | #BJPNews | #BreakingNews | #MarathiNews

Author: Prachi Sutar
Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.