मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीशांचे उद्धव ठाकरे यांच्यावर भरभरून कौतुक; राजकीय वर्तुळात चर्चा 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीशांचे उद्धव ठाकरे यांच्यावर भरभरून कौतुक; राजकीय वर्तुळात चर्चा 

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील कटु विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधांमध्ये, नागपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात अनपेक्षित वळण पाहायला मिळाले. या कार्यक्रमात देशाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करताच राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

कार्यक्रमादरम्यान न्या. गवई यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कोरोनासारख्या कठीण काळात उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही.” त्यांनी ठाकरेंचे नाव तीन-चार वेळा घेत भरभरून प्रशंसा केली. विशेष म्हणजे हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घडले, त्यामुळे उपस्थितांमध्ये कानोकानी कुजबुज सुरू झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.

त्याच कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांनी फडणवीस यांच्याबाबत हलकाफुलका विनोदही केला. “विधी विद्यापीठाच्या भूमिपूजनावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते, मग विरोधी पक्षनेते, नंतर उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून कार्यक्रमात आहेत,” असे म्हणत त्यांनी वातावरण हलकंफुलकं केलं.

फडणवीस-ठाकरे संबंधांची पार्श्वभूमी

  • २०१४: भाजप व शिवसेनेने स्वतंत्र लढत करून नंतर युती सरकार स्थापन केलं. फडणवीस मुख्यमंत्री तर शिवसेना सहयोगी पक्ष होती.
  • २०१९: युती करून लढल्यावर मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली.
  • २०२२: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळले आणि फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झाले.

त्यानंतर ठाकरे आणि फडणवीस हे दोघेही कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी झाले असून त्यांच्यातील संघर्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

राजकीय अर्थ

या पार्श्वभूमीवर, सरन्यायाधीशांच्या स्तुतिपर शब्दांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा ठरत आहे. फडणवीसांच्या उपस्थितीत ठाकरे यांचं कौतुक होणं हे केवळ एक योगायोग की सूचक संकेत – यावर राजकीय विश्लेषकांची नजर लागलेली आहे

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!