लांजा येथील गवळीवाडीतील धोकादायक लोखंडी साकवाची जि. प. बांधकाम विभागाकडून पाहणी; वाहतूक तात्काळ थांबवण्याचे निर्देश!
⭕ रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ची दखल

लांजा, रत्नागिरी: रत्नागिरी वार्ताहर डिजिटलने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत, लांजा तालुक्यातील साठवली, गवळीवाडी येथील सखाराम गोपाळे आणि विवेक गोपाळे यांच्या घराकडे जाणार्या धोकादायक लोखंडी साकवाची (iron bridge/footbridge) जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, लांजा यांनी पाहणी केली आहे. हा साकव कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत असल्याने, तो वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्याचे निर्देश जि. प. बांधकाम विभाग साठवली ग्रामपंचायतीला देणार आहे.
या पाहणीदरम्यान, जि. प. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोपाळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनाही या पुलावरून वाहतूक थांबवण्यास सांगितले आहे. पुलाची सद्यस्थिती पाहता, तो कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह?
या गंभीर प्रकरणात साठवली ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष समोर आले आहे. गेल्या १८ ते २० दिवसांपासून हा साकव धोकादायक स्थितीत असतानाही, ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाला याबद्दल कोणतीही कल्पना दिली नव्हती. यामुळे साठवली सरपंचांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांना पर्यायी मार्गाची चिंता
जर हा साकव ढासळला आणि वाहतुकीसाठी बंद झाला, तर गोपाळे कुटुंबीयांसह परिसरातील स्थानिक शेतकरी आणि त्यांच्या गुरांना पलीकडे जाण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून, या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
बातमी – जितेंद्र चव्हाण, लांजा
⭕ ???? ???? काल प्रसिद्ध झालेली बातमी














