वाटद कवठेवाडी शाळेत विद्यार्थी व पालकांसाठी आरोग्यविषयक जनजागृती शिबीर संपन्न  

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वाटद कवठेवाडी शाळेत विद्यार्थी व पालकांसाठी आरोग्यविषयक जनजागृती शिबीर संपन्न

 समता फाउंडेशनच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबीर

प्रतिनिधी निलेश रहाटे

खंडाळा : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद यांच्या सहकार्याने विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्यासाठी आरोग्यविषयक जनजागृती, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांची मोफत रक्त तपासणी तर वाटद ग्रामपंचायतचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अप्पा धनावडे यांचया पुढकरांनी आणि जिल्हा शासकीय रुग्णालय व समता फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा शिबीर उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाले.

या शिबिराच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सीएचओ माधुरी सावंत यांनी विद्यार्थ्यांना पावसाळी आजार, पिण्याचे पाणी, स्वच्छता, हात धुणे, अत्यावश्यक परिस्थितीत सीपीआरचे महत्व, इत्यादी बाबींची माहिती देताना पावसाळ्यात स्वतःची काळजी घेण्याबाबत सविस्तर माहिती देतानाच सीपीआर कसा द्यावा, हात कसे धुवावेत याबद्दल स्पष्टीकरण दिले.

तसेच याप्रसंगी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते उदय रहाटे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत शाळेत गुणवत्ताविषयक उपक्रम राबवितानाच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी करत असलेल्या प्रयत्नाबद्दल कौतुक केले.

या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने रक्त तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली. तर उपस्थित ग्रामस्थांची समता फाउंडेशनच्या सहकार्याने मोफत नेत्रचिकित्सा करण्यात आली.

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळा ही सातत्याने प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक उपक्रमाचे आयोजन करत असते.

या स्तुत्य उपक्रमाचे नियोजन गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे, सहकारी शिक्षिका राधा नारायणकर यांनी केले. तर या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सरपंच तथा शाळा विकास समितीचे अध्यक्ष आप्पा धनावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वाती धनावडे यांच्यासह शाळेचे बालरक्षक विश्वनाथ शिर्के, शाळेतील पालक तथा सामाजिक कार्यकर्ते उदय रहाटे यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी जिल्हा रुग्णालय रत्नागिरीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. संदीप उगवेकर यांनी नेत्रतपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सीएचओ माधुरी सावंत, परिचारिका पुनम लाड, उपकेंद्राच्या सोनाली जाधव, संगीत वाडकर, आशासेविका विनया मेस्त्री यांच्यासह समता फाउंडेशनचे नितीश शेटे यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी तर सर्वांचे आभार उपशिक्षिका राधा नारायणकर यांनी केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा