गुहागर – शृगारतळी….
विश्व हिंदू परिषदे ला स्थापन होऊन साठ वर्ष
पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने देशभर नगर/प्रखंड स्तरावर हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.या संमेलनात परिसरातील
सर्व ज्ञाती संस्था, सामजिक मंडळ विविध धार्मिक मंडळे – संस्था- संप्रदाय त्यांचे साधक आदींचा सहभाग रहावा अशी परिषदेची इच्छा आहे.म्हणून सदर संमेलनात ६० वर्षातील कार्याची उपलब्धि आणि आज देशात – विदेशात हिंदू समजा पुढील आव्हाने याबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. तरी या संमेलनास जास्तीच जास्त हिंदू समाजाने उपस्थित राहावे असे गुहागर प्रखंड अध्यक्ष श्री प्रकाश आ. सोलकर आणि प्रखंड मंत्री श्री बबन कुंभार यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे
सदर चें संमेलन हे दि.१सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी 2 वाजे पर्यंत शृगारतळी भवानी सभागृहात आयोजित असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. जगन्नाथजी सुर्वे – मंदिर अर्चक पुरोहित आयाम कोंकण प्रांत संयोजक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.